रेल्वे गाड्यांना जादा डबे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे गाड्यांना जादा डबे
रेल्वे गाड्यांना जादा डबे

रेल्वे गाड्यांना जादा डबे

sakal_logo
By

रेल्वे गाड्यांना जादा डबे
कणकवली, ता. १ः कोकण रेल्वेवरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात जादा डबे जोडले आहेत. या मार्गावरील काही गाड्यांमध्ये ही सेवा दिली आहे. गाडी क्र. २२९०८ हापा ते मंडगाव एक्सप्रेसला एका जादा डबा जोडण्यात आला आहे. तसेच गाडी क्र. २०९१० पोरबंदर ते कोचुवेली एक्सप्रेस या गाडीला ही जादा डबा जोडण्यात आला आहे. त्यामुळे प्रतिक्षा यादीवरील प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. होळी उत्सवामुळे सध्या रेल्वे गाड्यांना गर्दी झाली आहे. नियमित गाड्याची आरक्षण पुर्ण झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रेल्वेने या मार्गावारील काही लांबपल्यांच्या गाड्यांचे डबे वाढविले आहेत.