
चिपळूण ः श्री सदस्यांनी स्वच्छतेतून शहर केले चकाचक
फोटो ओळी
- ratchl१७.jpg ःKOP२३L८६२०३ चिपळूण ः महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी जन्मशताब्दीनिमित्त महास्वच्छता अभियानात सहभागी श्री सदस्य.
-------------
श्री सदस्यांनी केले चिपळूण शहर चकाचक
२४ टन कचरा संकलित ; ८१० श्री सदस्यांचा सहभाग
चिपळूण, ता. १ ः डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे बुधवारी (ता. १) चिपळुणात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. प्रतिष्ठानचे ८१० श्री सदस्य शहरातील विविध भागात स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरले. त्यांनी ओला कचरा १३ हजार ३०० व १० हजार ८०० किलो सुका कचरा, असा २४ हजार १०० किलो कचरा गोळा करून संपूर्ण शहर चकाचक केले.
अभियानात चिपळूण, लवेल, धामणंद, सावर्डे, अलोरे, सती, मालघर आदी बैठकीतील श्री सदस्य सहभागी झाले होते. त्यांनी शहरात बहादूरशेख नाका ते चिंचनाका, चिंचनाका ते पॉवर हाऊस, विरेश्वर तलाव रस्ता-बसस्टॅन्ड-विरेश्वर कॉलनी ते पॉवर हाऊस, अर्बन बँक ते भेंडीनाका, खेडेकर संकूल ते भेंडीनाका, पॉवर हाऊस ते पागनाका आदी भागातील रस्त्यांची साफसफाई करत कचऱ्याचे संकलन केले.
कचरा टाकण्यासाठी पालिकेने दोन डंपर, एक ट्रॅक्टर तसेच श्री सदस्यांनी वाहनांची व्यवस्था केली होती.
ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्ते दत्तक स्वरूपात घेऊन ते वर्षभर स्वच्छ ठेवण्याचे अभियान राबवण्यात येत आहे. दर महिन्याच्या चौथ्या रविवारी रस्ते साफ करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून एक मार्चला हे अभियान राबवण्यात आले. समारोपप्रसंगी पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक साळोखे, प्रमोद ठसाळे आदी उपस्थित होते.