ह्यूमन राईट कार्यकारिणी सभा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ह्यूमन राईट कार्यकारिणी सभा उत्साहात
ह्यूमन राईट कार्यकारिणी सभा उत्साहात

ह्यूमन राईट कार्यकारिणी सभा उत्साहात

sakal_logo
By

swt१२३.jpg
86388
कणकवलीः ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी संतोष नाईक यांची फेरनिवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करतांना जिल्हाध्यक्ष मंदार काणे, अर्जुन राणे व इतर पदाधिकारी.

ह्यूमन राईट कार्यकारिणी सभा उत्साहात
कणकवलीत आयोजनः महत्त्वपूर्ण निर्णयांवर एकमत
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. १ ः ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन, सिंधुदुर्ग या संघटनेच्या जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची पहिली संयुक्त सर्वसाधारण सभा गोपुरी आश्रम हॉल कणकवली येथे झाली. या सभेमध्ये संघटनेच्या वाढीसाठी विविध उपाययोजना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे नुतन जिल्हाध्यक्ष मंदार काणे हे होते. या सभेस कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी व सर्व तालुका पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोकण विभागीय अध्यक्ष नाईक यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांची ओळख करून दिली. कोकण विभागीय अध्यक्षपदी नाईक यांची फेरनिवड करण्यात आल्याने त्यांचे व सर्व जिल्हा पदाधिकारी तसेच तालुका पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी सावंतवाडी तालुका सचिव ॲड.संदीप चांदेकर यांनी संघटनेचे महत्त्व व आपल्या संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यात मार्गी लागलेले अनेक सार्वजनिक प्रश्न व विकासकामे याबद्दलची माहिती दिली. आपल्या संघटनेच्या ताकदीच्या दणक्याने प्रशासन यंत्रणा कशाप्रकारे खडबडून जागी होऊन सर्वसामान्य माणसांच्या अनेक समस्या व प्रश्न मार्गी लागण्यासाठी कशाप्रकारे मदत होते याचे अनेक दाखले दिले. संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपले हक्क, जबाबदारी आणि कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय व राज्य पदाधिकारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर लवकरच येणार आहेत. राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणी सभेसाठी जागा निश्चित करणे आणि त्या सभेच्या खर्चासाठी इच्छुक पदाधिकारी व तालुका कार्यकारणी विशेष पुढाकार घेऊन त्यासंबंधीचे योग्य नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.
संघटना वाढीसाठी व सर्वसामान्यांच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, याबाबत विचार विनिमय करण्यात आला. जे पदाधिकारी सलग तीन सभांना अनुपस्थितीत राहिल्यास त्या पदाधिकाऱ्याला संघटनेच्या पदावरून पायउतार व्हावे लागेल, त्याचे फक्त सदस्यपद राहील. संघटनेच्या वाढीसाठी प्रत्येक तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात यावेत. नवीन सभासद करण्याची मोहीम सर्व जिल्हा पदाधिकारी व तालुका पदाधिकारी यांनी किमान पाच नवीन सभासद बनविण्याचा संकल्प करण्यात आला. त्याचबरोबर सरकारी अधिकाऱ्यांशी म्हणजे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम व अन्य विभागांचे प्रशासकीय अधिकारी यांच्याशी नियमित संवाद भेटीच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेटी घेणे. त्याचबरोबर एखाद्या ठिकाणी अपघात किंवा दुर्घटना घडल्यास संपूर्ण पोलीस यंत्रणा, लोकप्रतिनिधी गुन्हेगाराच्या मागे उभी राहते, अशावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याठिकाणी उपस्थित राहून अपघातग्रस्तांच्या किंवा पिडीत व्यक्तीच्या पाठीमागे कर्तव्यदक्ष भावनेने ठामपणे उभे राहून अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देणे आवश्यक आहे.
संघटनेच्या विविध उपक्रमांसाठी सर्व खर्च वैयक्तिकरित्या केला जात आहे. तो यापुढे देणगीदार किंवा इच्छुक पदाधिकारी सदस्याकडून वर्गणी गोळा करून खर्च करण्याचे निश्चित करण्यात आले.
आयुष्यमान भारत कार्ड जनजागृती करण्यासाठी संबंधित ग्रामविकास अधिकारी यांची विविध समाजोपयोगी उपक्रम सर्व तालुका संघटनेच्या माध्यमातून राबविण्याविषयी विचारविनिमय करण्यात आला. यावेळी काहींना श्रद्धांजली वाहण्यात आली. शेवटी कणकवली तालुका उपाध्यक्ष सदाशिव राणे यांनी सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
-----------