
भिरवंडेत बीएसएनएल मोबाईल टॉवरला मंजूर
kan24.jpg
86294
भिरवंडेः येथे योगेश भागवत यांनी बीएसएनएल मोबाईल टॉवरच्या जागेची पाहणी केली. सोबत सतीश सावंत, नितिन सावंत आदी
-----------
भिरवंडेत बीएसएनएल
मोबाईल टॉवरला मंजूर
कनेडी, ता. २ः भिरवंडेत बीएसएनएलची इंटरनेट सुविधा अधिक सक्षमपणे मिळावी यासाठी मोबाईल टॉवरला मंजुरी मिळाली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केंद्र शासन स्तरावर केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून हा मोबाईल टॉवर मंजूर झाला आहे. बीएसएनएल मोबाईल टॉवरच्या जागेची पाहणी अधिकारी योगेश भागवत यांनी केली आहे.
भिरवंडे गावातील मुरडवेवाडी, आमनीपाचेवाडी, जांभूळभाटलेवाडी या भागात इंटरनेटचे सुविधा उपलब्ध होत नाही. नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेऊन सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना तालकाप्रमुख डॉ. प्रथमेश सावंत, उपतालुकाप्रमुख हेमंत सावंत यांनी मोबाईल टॉवर गावात उभारण्यासाठी खासदार विनायक राऊत यांच्याकडे पाठपुरावा केला होता. भिरवंडे गावातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय प्रशासनस्तरावर भारत दूर संचार विभागात पाठपुरावा करत या मोबाईल टॉवर मंजुरी मिळविली. बीएसएनएलकडून मोबाईल टॉवरची उभारणी करण्यासंदर्भात भिरवंडे गावात जाऊन जागेची पाहणी करण्यात आली. गावातील शासकीय जागेत हा मोबाईल टॉवर उभारण्यात येणार असल्याने सिंधुदुर्ग बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, बीएसएनएलचे उपमंडळ अधिकारी योगेश भागवत, ऑफिस सुप्रेडेंट गणेश वाघाटे यांनी बुधवारी भिरवंडे गावात येऊन जागांची पाहणी केली. त्यात जांभुळभाटले शाळेजवळची जागा निश्चित करण्यात आली. प्रशासकीय प्रक्रिया पुर्ण करून मोबाईल टॉवर लवकरच उभारण्यात येणार असल्याचे योगेश भागवत यांनी सांगितले. यावेळी भिरवंडे सरपंच नितीन सावंत, सचिन सावंत, अरुण सावंत आदी उपस्थित होते.