कथक कलाविष्काराने ‘विरासत’ची रंगत वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कथक कलाविष्काराने ‘विरासत’ची रंगत वाढली
कथक कलाविष्काराने ‘विरासत’ची रंगत वाढली

कथक कलाविष्काराने ‘विरासत’ची रंगत वाढली

sakal_logo
By

rat०२११.txt

बातमी क्र. ११ (टुडे ३ साठी)

कथ्थक कलाविष्काराने ‘विरासत’मध्ये रंगत

देवरूख अॅकॅडमीचा रौप्य महोत्सव ः शिल्पा मुंगळे व शिष्यांचे सादरीकरण

साडवली, ता. ३ ः देवरूख येथील ललित कला अॅकॅडमीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शिल्पा मुंगळे यांच्या संकल्पनेतून ''विरासत २०२३'' कार्यक्रम सादर झाला. यामध्ये मुंगळे आणि त्यांच्या सर्व शिष्यांनी सादर केलेल्या नृत्य, अभिनयाचे उत्कृष्ट मिश्रण रसिकांनी अनुभवले तसेच तबला-पखवाज वादनासोबत कथ्थकची जुगलबंदी खास आकर्षण ठरली.
नटेश्वरमुद्रेने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर त्रितालातील तबला-पखवाज वादनासोबत मुंगळे यांनी जुगलबंदी सादर केली. नाट्यसंगीतावर नृत्य, शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट गीतावर नृत्य सादर झाले. तरांना, गझल असे विविध प्रकारांवर एकापेक्षा एक सरस नृत्ये सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. गुरू मनीषा साठे यांच्या शिष्या मनीषा जोशी यांनी व त्यांची मुलगी रिद्धी यांनी गणेश वंदना, त्यानंतर ताल पक्षामध्ये रास ताल अशी पारंपरिक कथक नृत्यप्रस्तुती सादर केली. अभिनय अंगामध्ये भजन व रिद्धीने ठुमरी सादर केली. तरानाने कार्यक्रमाचा शेवट केला. अमोल कापसे यांनी कथ्थक कीर्तन परंपरा साकारली. भगवान विष्णूचे दशावतार आणि त्यामध्ये विठ्ठलाच्या अभंगांमधून सादर केले. त्यांनी एक आहार्य प्रस्तुती केली. साक्षात समोर विठ्ठल उभा राहिला आणि रसिक भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाले. या वेळी क्रेडाईचे अध्यक्ष अजय पित्रे, भारती पित्रे, वरुण पित्रे, मालविका पित्रे, विजय विरकर, आमदार शेखर निकम, माजी आमदार सुभाष बने, रोहन बने, युयुत्सु आर्ते, नीलेश चव्हाण, तहसीलदार सुहास थोरात, राजेंद्र महाडीक आदी उपस्थित होते. अपरांत येथे कथ्थक विषयाची दोन दिवस कार्यशाळा घेण्यात आली.