स्वाक्षरी स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वाक्षरी स्पर्धा
स्वाक्षरी स्पर्धा

स्वाक्षरी स्पर्धा

sakal_logo
By

rat०२१४.txt

बातमी क्र. १४ (टुडे पान २ साठी, संक्षिप्त)

फोटो ओळी
- rat२p१०.jgp-
८६३०२
खेड ः स्वाक्षरी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त आशुतोष कुलकर्णी याला गौरवताना मनसे नेते वैभव खेडेकर.
---
स्वाक्षरी स्पर्धेत आशुतोष कुलकर्णी प्रथम

खेड ः जागतिक मराठी भाषा दिन आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त येथील मनसेने सुरू केलेला मी मराठी स्वाक्षरी मराठी हा उपक्रम खेड शहरात झाला. यामध्ये आशुतोष कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक पटकावला. राजेंद्र लिंगायत द्वितीय तर सलोनी मोहिते यांनी तृतीय क्रमांक पटकावला. मराठी भाषेची गोडी वाढावी, मराठी अस्मिता जोपासली जावी याकरिता हा उपक्रम गेले १४हून अधिक वर्षे खेड शहर तसेच महाराष्ट्रात सर्वत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे केला जातो. या प्रसंगी उपस्थित मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, वैभवी खेडेकर, ऋषिकेश कानडे, नंदू साळवी, केदार वणजू, विनय माळी, राजश्री पाटणे उपस्थित होते.
--

सवणस झोलाई मंदिराचा १२ ला अमृत महोत्सव

खेड ः तालुक्यातील सवणस येथील ग्रामदैवत श्री झोलाई देवी मंदिराचा अमृत महोत्सव सोहळा रविवारी (ता. १२) मार्चला साजरा करण्यात येत आहे. या निमित्त विविधांगी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते ११ ग्रामदेवतेला अभिषेक, ११ ते १२ सत्यनारायणाची महापूजा, सायं. ३ ते ४ ग्रामस्थ मंडळाचे भजन, दिंड्या, महाप्रसाद, रात्री ९.३० वा. सत्कार, १० वा. तुरळ-धोंगडेवाडी येथील बहुरंगी नमन व वगनाट्य आदी कार्यक्रम होणार आहेत. जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
--

खेडमध्ये रविवारी चालण्याच्या स्पर्धा

खेड ः तालुका ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने रविवारी (ता.५) दोन गटांत चालण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. पुरुष वयोगट६० ते ७०, दुसरा गट ७१ ते पुढे. महिला वयोगट ६० ते ७०, दुसरा गट ७१ ते पुढे. स्पर्धेत प्रथम १ ते ३ क्रमांकाना वर्धापन दिनी बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रत्येक सभासदांनी येताना आधारकार्ड वयाचा पुरावा म्हणून आणावयाचे आहे याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
---

फोटो ओळी
-Rat२p१७.jpg ः
८६३१२
कांदिवली ः मानाच्या केळशी देव्हारे क्रीडा कमिटी स्पर्धेचे मानकरी खरवते संघ.
---
खरवते संघ ठरला क्रिकेट चॅम्पियन

मंडणगड ः दापोली-मंडणगड तालुक्यातील केळशी देव्हारे क्रीडा कमिटी यांच्या विद्यमाने प्रमोद महाजन मैदान कांदिवली मुंबई येथे आयोजित केलेली क्रिकेट स्पर्धा यशस्वी पार पडली. यामध्ये कालेश्वरी क्रिकेट संघ खरवते अंतिम विजेता व कालेश्वरी क्रिकेट संघ आमखोल उपविजेता पदाचा मानकरी ठरला. क्रीडा आणि सामाजिक विकासात्मक कामासाठी उगम नव्या ध्येयांचा याप्रमाणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत एकूण ३२ संघांनी सहभाग नोंदवला होता. अंतिम फेरीत दापोली तालुक्यातील आमखोल आणि खरवते संघ दाखल झाले होते. अत्यंत चुरशीच्या सामन्यात खरवतेने बाजी मारली. तृतीय विजेता संघ शिवशाही (चिंचघर), चतुर्थ संघ जय भवानी केगवल ठरला. यामध्ये मालिकावीर ओमकार (आमखोल), उत्कृष्ट फलंदाज कल्पेश (खरवते), उत्कृष्ट गोलंदाज सतीश (खरवते) यांना सन्मानित करण्यात आले तसेच शिस्तबद्द संघ सुपरस्टार क्रिकेट संघ वांझळोली गावठणवाडी संघाचा यथोचित गौरव करण्यात आला. स्पर्धा कार्याध्यक्ष राजेश कुळे, सागर जोशी, संदेश पंदिरकर, तुषार जवरत, प्रकाश हुमने, सचिन शिगवण, समस्त सर्व सल्लागार व सदस्य, सर्व खेळाडू यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडण्यात आली.
--

फोटो ओळी
-rat२p१६.Jpg ः
८६३११
साडवली ः देवरूख वांझोळे उपकेंद्राला शेखर निकम यांनी संगणक संच दिला.
--
देवरूख वांझोळे उपकेंद्राला संगणक संच भेट

साडवली ः साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वांझोळे उपकेंद्राला आमदार शेखर निकम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त संगणक संच भेट दिला. पूजा निकम यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला. वांझोळे सरपंच निधी पंदेरे व आरोग्यसेवक दत्तात्रय भस्मे यांनी यासाठी पाठपुरावा केला. देवरूखचे नगरसेवक प्रफुल्ल भुवड यांचेही सहकार्य मिळाले. या वेळी आरोग्यसेवक संभाजी साजणे, चारूलता पोखलेकर, शिल्पा राव आदी उपस्थित होते. निकम यांनी तातडीने संगणक उपलब्ध करून दिल्याबद्दल शेखर निकम व पूजा निकम यांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय महाडीक यांनी आभार मानले.
--