खेड-खेड तालुका टँकरमुक्त होण्याच्या आशा धूसर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-खेड तालुका टँकरमुक्त होण्याच्या आशा धूसर
खेड-खेड तालुका टँकरमुक्त होण्याच्या आशा धूसर

खेड-खेड तालुका टँकरमुक्त होण्याच्या आशा धूसर

sakal_logo
By

खेड तालुका टँकरमुक्तीच्या आशा धूसर

३७ गावांचा समावेश ः रखडलेला टंचाई आराखडा अखेर तयार

खेड, ता. २ ः पंचायत समितीचा रखडलेला पाणीटंचाई कृती आराखडा तयार झाला असला तरी तालुका टँकरमुक्त होण्याची आशा धूसर आहे. दापोली विधानसभा मतदारसंघातील २३ गावे, ५६ वाड्या, तर गुहागर मतदारसंघातील १४ गावे, ३४ वाड्या आराखड्यात समाविष्ट केल्या आहेत. टंचाई आराखड्यात धनगरवाड्यांचा सर्वाधिक समावेश असल्याने तालुक्यात यंदाही धनगरवाड्यांना पाणीटंचाईचे सर्वाधिक चटके बसणार आहेत.
जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई खेड तालुक्याला भेडसावते; मात्र गेल्या दोन वर्षापासून टंचाईग्रस्त गाववाड्यांच्या संख्येत काहीअंशी घट झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी पहिल्या टँकरपासून ते सर्वाधिक पाणीपुरवठा करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवत होती; मात्र तालुक्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्याच्यादृष्टीने प्रशासनाकडून योजना प्रभावीपणे राबवण्यावर भर देण्यात आला. विशेषतः गतवर्षापासून तालुक्यात बंधारे बांधण्यावर प्राधान्याने लक्ष देण्यात आले. आतापर्यंत लोकसहभागातून १०९ वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.
दापोली मतदार संघातील शिंगरी- फौजदारवाडी, पैरूचीवाडी, दहिवली-फणसवाडी, जैतापूर-धनगरवाडी नं. १, कावणकरवाडी, वाडीजैतापूर-धनगरवाडी, सुतारवाडी, दंडवाडी, कशेडी-थापेवाडी, बोरटोक, बंगला, शिंदेवाडी, शिरवली- दंडवाडी, मांडवे- सुतारवाडी, बेलदारवाडी, कोसमवाडी, धाकटे मांडवे, कुडवेवाडी, खवटी-खालची व वरची जाखलवाडी, शिरवली-धनगरवाडी, मंडलिककोंड, खालची धनगरवाडी, घेरारसाळगड-भराडे धनगरवाडी, भराडेवाडी, झापाडीवाडी, निमणीवाडी, पेठ बौद्धवाडी, ढेबेवाडी, धनगरवाडी आदींचा समावेश आहे. याशिवाय कुळवंडी-शिंदेवाडी नं. १ व २, तिसंगी-धनगरवाडी, आंबवली- वावेतर्फे धनगरवाडी, भिंगारा, भिंगारवाडी, तुळशी-कुबजई, नातू ढेबेवाडी, सवेणी- सुसेरी, देवसडे-सावंतवाडी, जाधववाडी, कदमवाडी, मधलीवाडी, बौद्धवाडी, वैरागवाडी, अस्तान- धनगरवाडी नं. २, माणी-शिंदेवाडी, जैतापूर-मोरेवाडी, सोंडे- सुकदर, देवघर-पांचाचामाळ, फौजदारवाडी, धनगरवाडी हुंबरी-म्हाळुंगे आदी गाववाड्या टंचाई आराखड्यात समाविष्ट आहेत. गुहागर मतदार संघातील नांदगाव-जाखलवाडी, कोरेगाव-तवकलीमाळ, बेलवाडी, विठ्ठलवाडी, चिरणी- कासई-बोरवाडी, धनगरवाडी, शिगवणवाडी, मुसाड-खानविलकरवाडी, कांगणेवाडी, बौद्धवाडी, वावे-गणेशनगर, भेलसई-गंगवाडी, कुपवाडी, पन्हाळजे माळवाडी, संगलट- सुतारवाडी, दवंडेवाडी, कुणबीवाडी, शिरगाव-गंगवाडी, बागवाडी, विलासनगर, ओबेगणवाडी, भोसलेवाडी, कोंडवाडी, पिंपळवाडी, गवळीवाडी, शिर्शी- मुकादमवाडी, चिनकटेवाडी, केळणे मांगलेवाडी, भोसलेवाडी, दयाळ-भडवळकरवाडी, गौळवाडी, धुमाळवाडी, खोपी-रामजीवाडी आदींचा समावेश आहे.


चौकट
सडेवाडीतील ग्रामस्थांचा टँकरसाठी अर्ज
तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाईची झळ वर्षानुवर्षे धनगरवाड्यांनाच बसत आहे. पाणीटंचाई संपुष्टात आणण्यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे. तसे होत नसल्याने पाण्याची व्यवस्था करताना वर्षानुवर्षे ग्रामस्थांच्या डोळ्यांत पाणी येत आहे. समाधानकारक पावसानंतरही टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पोसरे बुद्रुक सडेवाडीने टँकरसाठी अर्ज केला आहे.