
डिंगणी सरपंच, सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश
rat०२२९.txt
बातमी क्र.. २९ (पान २ साठी)
फोटो ओळी
- rat२p२५.jpg-
८६३६६
रत्नागिरी ः डिंगणी सरपंच आणि सदस्यांचे स्वागत करताना स्वागत उद्योजक किरण सामंत.
----
डिंगणी सरपंचासह सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश
सामंतांनी केले स्वागत ः गावाच्या विकासासाठी पाऊल
रत्नागिरी, ता. ३ ः राजापूर अर्बन बँकेचे संचालक, शिरगाव (रत्नागिरी) ग्रामपंचायत सदस्य अल्ताफ संगमेश्वरी यांच्या नेतृत्वाखाली संगमेश्वर तालुक्यातील डिंगणीमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. डिंगणी सरपंच समिरा अ. मजीद खान यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अजीम उमर खान, अर्पिता मंगेश काष्टे यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी आज सिंधुरत्न समृद्ध योजनेचे कार्यकारी समितीचे सदस्य किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
गेल्या काही दिवसांपासून अल्ताफ संगमेश्वर यासाठी प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे आणि डिंगणी ग्रामपंचायत शिंदे शिवसेनेकडे आली आहे. विशाल कदम, भगवान खाडे, नीता कदम, वसंत राऊत, अनिल कदम, मुनिरा पावसकर, हसिना खान, मैनुद्दीन वागले, फहीम जुवळे, आरबाज खान, चंद्रकांत कदम, अमित गमरे, सुनील कदम, नागचंद कदम, अफसर मिरकर, निहाल मिरकर, सोहेल सय्यद, सफिर शाह, उदय जोगले, सुनीता कदम, रमेश मोहिते, दिलीप कदम, सरिता कदम, रेश्मा मोहिते आदींनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. राज्याचे उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून गावाच्या विकासाच्या अनुषंगाने हा पक्षप्रवेश केला असल्याची माहिती डिंगणी सरपंच समिरा खान यांनी दिली. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी रिझवान मुजावर यांनीही परिश्रम घेतले. उद्योजक आणि सिंधुरत्न समितीचे सदस्य भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. त्यांनी प्रवेशकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.