लांजा-लांजामध्ये स्वच्छता अभियान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-लांजामध्ये स्वच्छता अभियान
लांजा-लांजामध्ये स्वच्छता अभियान

लांजा-लांजामध्ये स्वच्छता अभियान

sakal_logo
By

-rat२p३५.jpg ःKOP२३L८६४४१ लांजा ः लांजा शहरात स्वच्छता करताना श्री सदस्य.
---------------

लांजामध्ये स्वच्छता अभियान
लांजा ः डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने बुधवारी लांजा शहर परिसरात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले. या उपक्रमात प्रतिष्ठानचे सुमारे सव्वातीनशे श्रीसदस्य सहभागी झाले होते. या अभियानाच्या माध्यमातून ओला आणि सुका असा सुमारे सात टन कचरा हा गोळा करण्यात आला. लांजा रेस्ट हाऊस ते कोर्लेफाटा या अंतरादरम्यान मुंबई-गोवा महामार्गाच्या दुतर्फा स्वच्छता करण्यात आली. तसेच काळा पूल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओला कचरा साचला होता. शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. अभियानात प्रतिष्ठानचे सुमारे सव्वातीनशे श्रीसदस्य सहभागी झाले होते. अभियानांतर्गत ओला कचरा २ टन ५०० किलो तर सुका कचरा ४ टन ९०० किलो गोळा करण्यात आला.