फसवणूकप्रकरणी सायबर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणूकप्रकरणी सायबर गुन्हा दाखल
फसवणूकप्रकरणी सायबर गुन्हा दाखल

फसवणूकप्रकरणी सायबर गुन्हा दाखल

sakal_logo
By

rat०२३८.txt

बातमी क्र. ३८ (पान ३ साठी)

वीजबील भरले नसल्याचे सांगून फसवणूक

दोघा भामट्यांवर गुन्हा ; सायबर पोलिसाकडून तपास सुरू

रत्नागिरी, ता. २ ः वीजबिल भरले नाहीतर वीजपुरवठा बंद करण्यात येईल, असा संदेश पाठवून अॅप डाउनलोड करण्यास सांगून डेबिट कार्डची माहिती घेऊन प्रौढाची फसवणूक केल्या प्रकरणी संशयिताविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गुप्ता -गुप्ताचा सीनिअर अधिकारी शिवकुमार मंजूदेवी (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार २५ फेब्रुवारी दुपारी २ ते सायंकाळी साडेचारच्या सुमारास शिवाजीनगर येथे घडला.
पोलिसांनी दिलेली माहिती, अशोक शांताराम धकाते (वय ५५, मुळ ः देवानगर नागपूर सध्या रा. रत्नागिरी) यांच्या पत्नीच्या मोबाईलवर संशयित गुप्ता याने एमएसईबी पुणेचा अधिकारी असल्याचे भासवून लाईट बिल न भरल्यास विद्युत पुरवठा बंद करण्यात येईल, असा एसएमएस पाठवला. २५ फेब्रुवारीला आलेल्या नंबरवर अशोक धकाते यांनी फोन केला असता समोरून राहुल गुप्ता असे नाव सांगण्यात आले व संशयिताने लाईट बिलाचे ऑनलाईन सिस्टीममध्ये अपडेट करण्यासाठी प्ले स्टोअरवरून त्याने अॅप डाऊनलोड व इन्स्टॉल करावयास भाग पाडले. तसेच अशोक यांच्याकडून त्यांच्या डेबिड कार्डची माहिती प्राप्त करून घेऊन त्या आधारे फिर्यादी यांची फसवणूक केली. या प्रकरणी अशोक धकाते यांनी सायबर गुन्हे शाखेत तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.