कम अँड लर्न फिजिक्स उपक्रमाला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कम अँड लर्न फिजिक्स उपक्रमाला प्रतिसाद
कम अँड लर्न फिजिक्स उपक्रमाला प्रतिसाद

कम अँड लर्न फिजिक्स उपक्रमाला प्रतिसाद

sakal_logo
By

rat०३१३.txt

बातमी क्र.. १३ (टुडे पान ३ साठी)

- rat३p३.jpg-
८६५७३
रत्नागिरी ः गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात फिजिक्स फेअर उपक्रमात माहिती घेताना शालेय विद्यार्थी.

जोगळेकर महाविद्यालयात भौतिकशास्त्रावर उपक्रम

रत्नागिरी, ता. ३ ः दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागातर्फे भौतिकशास्त्रातील काही मुलभूत संकल्पनांशी संबंधित कम अँड लर्न फिजिक्स-अ फिजिक्स फेअर हा उपक्रम आयोजित केला. यामध्ये नववीच्या विद्यार्थ्यांकरिता उपयुक्त माहिती देणारे विविध प्रयोग मांडण्यात आले होते.
ऊर्जा, ध्वनी, प्रकाश, प्रकाशाचा वर्णपट, अनुनाद, पृष्ठताण, विद्युत चुंबकीय परिणाम, निरीक्षण आणि मापन यांचे महत्व सांगणारे असे विविध प्रयोग आयोजित करण्यात आले आणि प्रतिकृतींचा वापर संकल्पना स्पष्ट होण्यासाठी करण्यात आला. महाविद्यालयातील शास्त्र शाखेच्या भौतिकशास्त्र विषयाच्या पदवी आणि पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांनी या प्रयोगांची मांडणी केली व शालेय विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत त्यातील वैज्ञानिक तत्वे प्रयोगांसह समजावून सांगितली. या प्रदर्शनाचा जीजीपीएस, शिर्के प्रशाला आणि सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयातील ९० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे संकल्पना समजावून घेण्याचा उपक्रम असल्याने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आणि सकारात्मक प्रतिसाद दिला.
या उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी पी कुलकर्णी आणि शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी सदिच्छा भेट दिली. हा सुनियोजित उपक्रम भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. महेश बेळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागातील इतर प्राध्यापक व प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे झाला.