
वुमन्स वेल्फेअरकडुन वरवडे विद्यालयाला वेस्टबिन
rat०३२५.txt
बातमी क्र.. २५ (पान २ साठी)
फोटो ओळी
- rat३p१६.jpg-
८६६१९
रत्नागिरी ः तालुक्यातील वरवडे विद्यालयाला वुमन्स वेल्फेअरकडून वेस्टबिन प्रदान करण्यात आले.
--
वुमन्स वेल्फेअरकडून वरवडे विद्यालयाला वेस्टबिन
रत्नागिरी, ता. ३ ः तालुक्यातील वरवडे माध्यमिक विद्यालयात डोंबिवली वुमन्स वेल्फेअर सोसायटीच्यावतीने वेस्टबिन वितरित करण्यात आले. सुज्ञ मुलं, सुजाण नागरिक अभियानाअंतर्गत स्वच्छ शाळा मोहीम रत्नागिरी तालुक्यातील शाळांमध्ये राबवली जात आहे.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. स्वाती गाडगीळ, ट्रेझरार सुनीता नेहते यांच्या माध्यमातून व कोतवडे गावचे माजी सरपंच तुफील पटेल यांच्या प्रयत्नाने प्रशालेस ४८ किलो कचरा साठवणूक क्षमतेचे (१२० लिटर) क्लिनो वेस्टबिनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी कोतवडेचे माजी सरपंच तुफील पटेल, प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक राजेश जाधव, प्रशांत विचारे, शिक्षिका गराडे, पवार, देवयानी कदम, मनोज महाडिक, सुहास कुंभार याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी मंगला चावरे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेच्या अध्यक्षा डॉ. गाडगीळ यांनी थेट आफ्रिका येथील केनिया या देशातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला.