बांदा येथे रस्ता कामाचा प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांदा येथे रस्ता कामाचा प्रारंभ
बांदा येथे रस्ता कामाचा प्रारंभ

बांदा येथे रस्ता कामाचा प्रारंभ

sakal_logo
By

86426
बांदा ः येथे रस्ता कामाचा प्रारंभ करताना सुधीर साटेलकर. शेजारी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब आदी.

बांदा येथे रस्ता कामाचा प्रारंभ
बांदा ः शहरातील श्री देव बांदेश्वर मंदिर कडील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुधीर साटेलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. १५ वा वित्त आयोग निधीतून १ लाख ८५ हजार रुपये खर्चून या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, बाळु सावंत, रेश्मा सावंत, श्रेया केसरकर, माजी सरपंच दीपक सावंत, नाना सावंत, साई धारगळकर, शैलेश केसरकर, सर्वेश मुळ्ये आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
--
86502

सुधांशू सोमणचे युवा महोत्सवात यश
देवगड : बेंगलोर येथे झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवामध्ये भारतीय समूह गीत (इंडियन ग्रुप साँग) या कला प्रकारात मुंबई विद्यापीठाच्या संघाने सुवर्ण पदक प्राप्त केले. मुंबई विद्यापीठाच्या या संघामध्ये येथील स. ह. केळकर महाविद्यालयातील प्रथम वर्ष माहिती तंत्रज्ञान विषयाचा विद्यार्थी सुधांशू सोमण याचा सहभाग होता. फेब्रुवारीत दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाला कव्वाली प्रकारात राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक प्राप्त झाले. या विजेत्या कव्वाली गीत गायन करणाऱ्या समुहामध्ये सुद्धा सुधांशु याचा सहभाग होता. युवा महोत्सवाच्या विभागीय स्पर्धा ते राष्ट्रीय स्पर्धा अशी सुधांशू याने घेतलेली यशस्वी भरारी गायन, वादन या कलांसोबतच सातत्य, सराव, प्रयत्न यामुळेच शक्य झाले. या यशाबाबत शिक्षण विकास मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह प्रभारी प्राचार्या सुखदा जांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख नितीन वळंजू, आयक्यूएसी समन्वयक सुनेत्रा ढेरे आदींनी अभिनंदन केले.
----
संत रोहिदासांना दाभोलीत अभिवादन
वेंगुर्ले ः श्री साई युवक मंडळ दाभोली-दाभोलकरवाडी येथे संत रोहिदास जयंती साजरी करण्यात आली. साई युवक मंडळाचे उपाध्यक्ष दत्ताराम दाभोलकर यांनी श्री संत रोहिदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत पूजन केले. साई युवक मंडळाचे सल्लागार शेखर दाभोलकर यांनीही पुष्पहार घालून पूजन केले तसेच मंडळाचे सचिव सागर दाभोलकर मंडळाचे कार्यकर्ते बाळकृष्ण दाभोलकर, मधुसुदन दाभोलकर, सुभाष दाभोलकर, सौ. नम्रता दाभोलकर, गोपिका दाभोलकर यांनीही प्रतिमेचे पूजन केले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी दत्ताराम दाभोलकर, शेखर दाभोलकर, सागर दाभोलकर यांनी मनोगत व्यक्त केले.
----------------------
वेंगुर्लेत बुधवारी विविध कार्यक्रम
वेंगुर्ले ः सखीमंच वेंगुर्लेच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्चला सायंकाळी पाचला साई मंगल कार्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये महिलांनी समूहनृत्य व कला सादर करावयाच्या आहेत. प्रणाली अंधारी अथवा श्वेता आरोसकर यांच्याकडे नाव नोंदणी करावी.