
सादरीकरण, देहबोली, उत्तम संवाद यशस्वी बनवते
rat०३१८.txt
बातमी क्र..१८ (पान २ साठी)
फोटो ओळी
-rat३p६.jpg ः
८६५७६
हर्णै ः पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी बोलताना कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत.
---
सादरीकरण, देहबोली, उत्तम संवाद यशस्वी बनवते
डॉ. प्रमोद सावंत ; विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन गौरव
हर्णै, ता. ३ ः गुणवंत विद्यार्थी आणि हिरा यांच्यात एक साधर्म्य आहे. ज्या मानकांचा उपयोग हिऱ्याचे मूल्यमापन करण्यासाठी केला जातो त्यांचाच विद्यार्थ्यांची गुणवत्ता मूल्य मापनासाठीसुद्धा केला जातो. विद्यार्थ्यांनी गुणवत्ता विकासासाठी सकारात्मक ऊर्जा, प्रभावी व्यक्तिमत्व, चिकाटी हे गुण तर जीवनात यशस्वी होण्यासाठी सादरीकरण, देहबोली आणि उत्तम संवाद ही कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
दापोली येथील वराडकर-बेलोसे महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी डॉ. प्रमोद सावंत व इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांनी प्रास्ताविकात कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचे स्मरण केले. संस्थेचे कार्यवाह डॉ. दशरथ भोसले व संचालिका सुनीता बेलोसे यांनी महाविद्यालयाने वर्षभरात आयोजित केलेल्या अनेकविध उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले. संस्था सभापती शिवाजीराव शिगवण यांनी विद्यार्थ्यांनी मनापासून व अपार कष्ट करावेत. यश नक्की मिळतेच, असे सांगितले. कार्यक्रमाला उपसभापती प्रियदर्शन बेलोसे, अनंत सणस, धनंजय यादव, सुनील चव्हाण, सुनील पुळेकर आदी उपस्थित होते.
-