
राजापूर अर्बन बँकेला बँको ब्लू रिबन पुरस्कार
rat०३२०.txt
बातमी क्र.२० (पान २ साठी)
फोटो ओळी
- rat३p१०.jpg ः
८६५९४
राजापूर ः ’बँको’ ब्लू रिबन २०२२’ पुरस्कार स्वीकारताना राजापूर अर्बन बँकेचे उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर, सहाय्यक सरव्यवस्थापक लक्ष्मण म्हात्रे, कर्मचारी सुनील खडपे आदी.
----
राजापूर अर्बन बँकेला बँको ब्लू रिबन पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ ः सहकार आणि व्यापारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोल्हापूर येथील अविज् पब्लिकेशन, पुणे येथील गॅलक्सी इन्मा या सहकारी बँक संदर्भ ग्रंथ संस्थेकडून राजापूर अर्बन बँकेला बँको ब्लू रिबन २०२२ या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. ३५० ते ४०० कोटी रुपये ठेवी या विभागातून बँकेला हा पुरस्कार जाहीर झाला असून अद्ययावत बॅंकिंग सुविधांच्या साहाय्याने ग्राहकाभिमुख सेवा उपलब्ध करून देणाऱ्या राजापूर अर्बन बँकेने सलग दहाव्या वर्षी या बँको पुरस्कारावर यशाची मोहोर उमटवली आहे.
महाबळेश्वर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमामध्ये बँकेचे उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर, सहाय्यक सरव्यवस्थापक लक्ष्मण म्हात्रे, कर्मचारी सुनील खडपे यांनी नॅफकॅबचे अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता, अविज् पब्लिकशनचे अविनाश शिंत्रे गुंडाळे, गॅलक्सी इन्मा पुणेचे डायरेक्टर अशोक नाईक यांच्या हस्ते हा पुरस्कार स्विकारला. सुमारे १०२ वर्षापूर्वी स्थापना झालेल्या राजापूर अर्बन बँकेने सहकार क्षेत्रामध्ये अद्ययावत ग्राहकाभिमुख बँकिंग सुविधा उपलब्ध करून देत आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. २००९ पासून एनपीए शून्य टक्के राखणार्या बँकेने ग्राहकांना बँकिंग सेवा देण्यासाठी अद्ययावत बॅंकिंग सेवासुविधांचा अवलंब केला आहे. सरकारी आणि खासगी बॅंकांप्रमाणे व्हॉट्सअॅप, पेटीएम, फोनपे, गुगल आदींसारख्या अत्यावश्यक सुविधा ग्राहकांसाठी सेवाही सुरू केल्या आहेत.