धामणसेत नमन खेळ्यांनी परपंरा जपली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धामणसेत नमन खेळ्यांनी परपंरा जपली
धामणसेत नमन खेळ्यांनी परपंरा जपली

धामणसेत नमन खेळ्यांनी परपंरा जपली

sakal_logo
By

rat०३२९.txt

बातमी क्र.. २९ (पान २ साठी, अॅंकर)
(टीप- वितरण विभागाने दिलेली बातमी)

फोटो ओळी
-rat३p२४.jpg ः
८६६५८
रत्नागिरी ः धामणसे गावात शिमगोत्सवानिमित्त नमन खेळे सादर करताना ग्रामस्थ.
----

धामणसेत नमन खेळ्यांनी जपली परपंरा

शिमगोत्सव ; गोमूसह संकासूर ठरतोय लक्षवेधी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ३ ः रत्नागिरी तालुक्यातील धामणसे गावात शिमगोत्सवानिमित्त नमन खेळ्यांची परपंरा जोपासली जात आहे. घरोघरी जावून नमन, खेळे सादर केले जात आहेत.
चौकेवाडी, लोगडेवाडी, इरमलवाडी, रेवाळेवाडी या वाड्यांतील नमन खेळे गावात गेले सहा दिवस घरोघरी जाऊन फिरत्या नमन खेळ्याची पारंपरिक कला जोपासत आहेत. शिमगोत्सवात नमन आणि खेळ्यांची परंपरा कमी होत चालली आहे. यानिमित्ताने गावात फिरणाऱ्या गोमूही कमी झाल्या आहेत. ही परंपरा धामणसे गावात जपली जात आहे. यावर्षी खेळ्यांच्या वेशभुषेसाठी दानशूर देणगीदार संतोष सावंत यांनी दहा हजार रुपये, तर नमनप्रेमी, शक्तीतुरा, नमन आयोजक सुभाष बांबरकर यांनी पाच हजाराची देणगी देऊन बहुमोल सहकार्य केले. फिरत्या खेळ्यात गावकर जगदीश लोगडे, गावकर राजाराम लोगडे, विजय लोगडे, मारूती लोगडे, पांडुरंग लोगडे, मारूती गणू लोगडे, पांडुरंग सदाशिव लोगडे, अनंत लोगडे, यशवंत इरमल, सुरेश डाफले, भिकाजी तांबे, वासुदेव गोणबरे, देवक गोणबरे, यशवंत गोणबरे, कृष्णा गोणबरे, सोनू काताळे, हरिश्चंद्र कळंबटे, अंकुश लोगडे, वसंत गोणबरे, बाळकृष्ण गोणबरे, चंद्रकांत गोणबरे यांनी सहभाग घेतला. देवक गोणबरे यांनी गोमू तर पांडुरंग लोगडे यांनी संकासुराची वेशभूषा केली होती.
---