
माजी बांधकाम सभापती नारकरांचा शिंदे गटात प्रवेश
rat3p29.jpg
86689
राजापूरः प्रवेशकर्त्या माजी जिल्हा परिषद सदस्य अजित नारकर, गावकर दत्ताराम ठुकरूल, सरपंच रूची बाणे, बाळकृष्ण तांबे आदींचे शिवसेनेत स्वागत करताना नेते किरण सामंत, राहुल पंडित, अशफाक हाजू व अन्य.
----------------
माजी बांधकाम सभापती
नारकरांचा शिंदे गटात प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ः शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अजित नारकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे गटाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत पडवे गावचे गावप्रमुख दत्ताराम ठुकरूल, पडवेच्या सरपंच रूची बाणे, राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबे यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला.
शिवसेनेचे राजापूर तालुकाप्रमुख अशफाक हाजू यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी येथे पक्षाच्या कार्यालयात प्रवेश झाला आहे. या सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित व उद्योजक आणि शिवसेनेचे रत्नागिरीतील नेते किरण सामंत यांनी स्वागत केले. अणसुरेचे माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत गावकर यांच्यासह अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केलेला असताना आता सागवे जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती नारकर यांनीही शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासमवेत आनंद बापट, अमित दीक्षित, ग्रामपंचायत सदस्य स्वाती तांबे, यशवंत तांबे, जगन्नाथ वतांबे, श्रीराम मेस्त्री, बाळकृष्ण तांबे, स्वप्नील तांबे, ओंकार अवसरे यांनीही शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याची माहिती शिंदे गटाचे तालुकाप्रमुख हाजू यांनी दिली. या सर्व प्रवेशकर्त्यांचा पक्षात योग्य सन्मान केला जाणार असून, भविष्यामध्ये पडवे गावच्या विकासासाठी आवश्यक तो निधी पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मिळवून दिला जाईल असेही हाजू यांनी आश्वासित केले आहे.