१७ गावठाण जमीनधारकांना कलंबिस्तमध्ये सनद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१७ गावठाण जमीनधारकांना कलंबिस्तमध्ये सनद
१७ गावठाण जमीनधारकांना कलंबिस्तमध्ये सनद

१७ गावठाण जमीनधारकांना कलंबिस्तमध्ये सनद

sakal_logo
By

86843
कलंबिस्त ः शेतकऱ्यांना सनद पत्र वाटप करताना सरपंच सपना सावंत. बाजूला उपसरपंच सुरेश पास्ते, बाळा राजघे, मधुकर राऊळ, संदीप सावंत, सूर्यकांत राऊळ, सीताराम राऊळ, दत्ताराम राऊळ आदी.

१७ गावठाण जमीनधारकांना कलंबिस्तमध्ये सनद
सावंतवाडी, ता. ४ ः कलंबिस्त गावात गावठाण वस्तीत १७ गावठाण जमीनधारक शेतकऱ्यांना येथील उपविभागीय भूमिअभिलेख कार्यालयातर्फे ग्रामपंचायतीच्या सहकार्याने सनद वाटप करण्यात आली. भूमी अभिलेख विभागामार्फत गावठाण जमिनीचे सर्वेक्षण व जमीन मोजणी भूमी अभिलेख विभागाचे जिल्हाध्यक्ष वीर व तालुका उपाधीक्षक प्रियदा साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आले.
या पार्श्वभूमीवर काल (ता. ३) कलंबिस्त-राऊळवाडी येथील गावठाण वस्तीतील भागात जाऊन सरपंच सपना सावंत यांच्या हस्ते शेतकऱ्यांना सनद वाटप उपक्रम राबविण्यात आला. यावेळी उपसरपंच सुरेश पास्ते, भूमिअभिलेख उपविभागीय कार्यालय सावंतवाडीचे कर्मचारी संदीप सावंत, सामाजिक कार्यकर्ते बाळा राजगे, मधुकर राऊळ, सूर्यकांत राऊळ, सीताराम राऊळ, दत्ताराम राऊळ, गणू राऊळ, शंकर राऊळ, राजाराम राऊळ, नरेंद्र पास्ते, वनिता पास्ते, गंगाराम राऊळ, एकनाथ राऊळ, शांताराम राऊळ, अक्षय राऊळ, आनंद राऊळ, ग्रामसेवक बाळासाहेब फुंदे आदी शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी एकूण १७ शेतकऱ्यांना भूमिअभिलेख विभागामार्फत जमिनीची सनद पत्रे देण्यात आली. हा उपक्रम थेट वस्तीत जाऊन ग्रामपंचायत विभागामार्फत राबविण्यात आल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. गावागावातील वस्तीत जाऊन यापुढे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक उपक्रम घेतले जातील, असे सरपंच सावंत यांनी स्पष्ट केले.