कट्टा येथे गोधडी प्रशिक्षणास प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कट्टा येथे गोधडी प्रशिक्षणास प्रतिसाद
कट्टा येथे गोधडी प्रशिक्षणास प्रतिसाद

कट्टा येथे गोधडी प्रशिक्षणास प्रतिसाद

sakal_logo
By

86872
कट्टा ः गोधडी शिवणकाम करताना प्रशिक्षणार्थी महिला.

कट्टा येथे गोधडी प्रशिक्षणास प्रतिसाद
ओरोस ः बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा येथे महिलांसाठी गोधडी प्रशिक्षण वर्ग नुकताच झाला. मातृमंदिर देवरुखच्या तज्ज्ञ मार्गदर्शिका अंजली माळी आणि त्यांच्या सहकारी रुपा जोयशी, दीपाली जोयशी यांच्या मार्गदर्शना खाली महिलांना हे दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी माळी यांनी गोधडी आणि रजई तयार करून एखादी महिला उदरनिर्वाह करू शकते, हे उपस्थित महिलांना स्पष्ट करून सांगितले. सर्व महिलांनी आत्मीयतेने व आवडीने या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. गोधडीसह पायपुसणी व बटवा याचेही प्रशिक्षण देण्यात आले. समारोप कार्यक्रमात सौ. मेस्त्री, सौ. सरमळकर, कुमारी चव्हाण यांनी कुशल प्रशिक्षणाबद्दल माळी व त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. माळी यांनी प्रशिक्षणार्थींच्या शिकण्याच्या आवडीबद्दल आनंद व्यक्त करून गरज पडल्यास पुन्हा प्रशिक्षण देण्यास तयार असल्याचे नमूद केले. आरती कांबळी यांनी मनोगत व्यक्त केले. अंजली माळी व सहकाऱ्यांचा सेवांगणतर्फे सत्कार करण्यात आला. प्रशिक्षण वर्गाचे नियोजन सुजाता पावसकर, बाळकृष्ण गोंधळी यांनी केले होते. किशोर शिरोडकर, दीपक भोगटे, बापू तळवडेकर, मनोज काळसेकर, आरती कांबळी, सौ. मठकर आदी उपस्थित होते.
..............
86871
रामहरी बर्डे

भूमिअभिलेख परीक्षेत रामहरी बर्डेंचे यश
ओरोस ः जिल्ह्यातील भूमिअभिलेख विभागात कार्यरत असलेले भूकरमापक रामहरी बर्डे यांनी आपल्या विभागाच्या सेवा प्रवेशात्तर परीक्षेमध्ये राज्यामध्ये सर्व विभागात प्रथम क्रमांक मिळविला. वर्ग ४ मधून पदोन्नती झालेले कर्मचारी बर्डे हे अभ्यासू आणि चिकित्सकवृत्तीने काम करत असतात. भूकरमापक म्हणून देखील वैभववाडी कार्यालयात अतिशय उत्तम काम करीत आहेत. खात्यांतर्गत सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण सत्र १०९ मध्ये त्यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळविला. हे यश मिळविताना त्यांना जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख डॉ. विजय वीर, उपअधीक्षक भूमिअभिलेख यांचे मार्गदर्शन मिळाले.