थकबाकीदारांविरोधात पालिका घेणार अॅक्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थकबाकीदारांविरोधात पालिका घेणार अॅक्शन
थकबाकीदारांविरोधात पालिका घेणार अॅक्शन

थकबाकीदारांविरोधात पालिका घेणार अॅक्शन

sakal_logo
By

rat०४२९.txt

बातमी क्र..२९ (पान ५ साठी)

फोटो ओळी
-rat४p२१.jpg ः
८६८९१
राजापूर नगर पालिका
--

थकबाकीदारांविरोधात पालिका घेणार अॅक्शन

राजापूर पालिका ; नावे फलकावर झळकवणार

राजापूर, ता. ४ ः मर्यादित उत्पन्नाचे स्रोत असलेल्या ‘क’ वर्गीय राजापूर नगर पालिका प्रशासनाने करवसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. चार पथकांमार्फत करवसुली मोहीम राबवूनही अनेकांनी कराची रक्कम थकित ठेवली आहे. अशा थकबाकीदारांच्या विरोधात पालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये येताना थकबाकीदारांची नावे फलकावर झळकवण्याच्या पवित्र्यामध्ये आली आहे. त्या दृष्टीने पालिकेच्या प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. सुमारे शंभरहून अधिक थकबाकीदारांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
शहरवासियांकडून विविध प्रकारची आकारण्यात येणारी करवसुली प्रशासनाकडून केली जात आहे. त्यामध्ये पाणीपट्टी सुमारे ७० टक्के तर घरपट्टीची सुमारे ६५ टक्के वसुली झाल्याची माहिती मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिली. थकित नळसंयोजन धारकांचा पाणीपुरवठाही खंडित करण्यात आला आहे. करवसुलीसंबंधित नियोजन करण्यात आले असून त्यासाठी चार पथकेही गठित करण्यात आली आहेत. करदात्यांनी वेळीच करभरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन भोसले यांनी केले आहे.
‘क’ वर्गीय नगर पालिकेचे स्वउत्पन्नाचे मर्यादित स्रोत असल्याने पालिकेने कराद्वारे मिळणारे उत्पन्न हेच हक्काचे उत्पन्नाचे स्त्रोत आहे; मात्र, या करवसुलीमध्ये कोरोना महामारीपासून काहीशी अनियमितता येऊ लागल्याने त्याचा अप्रत्यक्षरित्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध होण्यावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे मुख्याधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने करवसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यासाठी गठित करण्यात आलेल्या पथकांमार्फत करवसुलीची धडक मोहीम हाती घेतली आहे. मात्र, तरीही ज्या थकबाकीदारांकडून करभरणा करण्यासाठी टोलवाटोलवी केली जात आहे अशांची फलकांवर नावे झळकवण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. त्यामध्ये सुमारे शंभरहून अधिक थकबाकीदारांचा समावेश आहे.
---
सुट्टी असूनही करवसुली सुरूच

करदात्यांकडून करवसुली करण्यासाठी मुख्याधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांची चार पथके गठित करण्यात आली आहेत. या पथकामध्ये पालिकेतील सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून या पथकांमार्फत घरोघरी भेट देणे, फोनद्वारे थेट संपर्क साधणे, नोटिसा बजावणे आदी स्वरूपाची कार्यवाही केली जात आहे. शनिवारची कार्यालयीन सुट्टी असूनही ती सुट्टी विसरून या पथकांमार्फत आज शहरामध्ये करदात्यांकडून करवसुलीची धडक मोहीम राबवली जात होती.