
दाभोळ-विसापूरमध्ये सापडले पाच गावठी जिवंत बॉम्ब
rat०४३५.txt
बातमी क्र..३५ (पान ३ साठी)
विसापुरात पाच गावठी जिवंत बॉम्ब
न्यायालयाच्या परवानगीने नष्ट ; अज्ञाताविरोधात गुन्हा
दाभोळ, ता. ४ ः दापोली तालुक्यातील विसापूर सोवेलीदरम्यान असणाऱ्या भागात पाच गावठी जिवंत बॉम्ब सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने बॉम्ब शोध व नाशपथकाच्या साहाय्याने ते ताब्यात घेऊन न्यायालयाच्या परवानगीने नष्ट केले आहेत.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेली माहिती, रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना या गावठी बॉम्बची माहिती मिळाली. त्यानुसार विभागाच्या पथकाने दापोली विसापूर ते महाड रस्त्यावर सोनेरी विनेखिंड येथील रस्त्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या कंपनीच्या फलकाजवळ जंगलाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यालगत झाडीत शोध घेतला. त्यांना गवतात एक सुपारीएवढ्या गोल आकाराच्या पिवळ्या रंगाचा त्यावर सुतळी दोरा गुंडाळलेला बॉम्बसदृश वस्तू आढळून आली. त्यानंतर रत्नागिरी येथून श्वानपथक व बॉम्ब शोध व नाशपथकाला पाचरण करण्यात आले. त्यांनी उर्वरित ४ गावठी बॉम्ब शोधून काढले. त्यानंतर न्यायालयाच्या परवानगीने हे बॉम्ब नष्ट करण्यात आले. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे हवालदार सुभाष भागणे यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक निनाद कांबळे करत आहेत. गावठी बॉम्ब शोधमोहिमेत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, हवालदार शांताराम झोरे, नितीन डोमणे, बाळू पालकर, चालक दत्तात्रय कांबळे, बॉम्बशोध व नाशपथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्राप्ती मचणेकर, श्वानपथकाचे गमरे हे सहभागी झाले होते.
--