सावर्डे-आजपासून शिमगोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावर्डे-आजपासून शिमगोत्सव
सावर्डे-आजपासून शिमगोत्सव

सावर्डे-आजपासून शिमगोत्सव

sakal_logo
By

सावर्डेत आजपासून शिमगोत्सव
सावर्डे, ता. ४ः चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावात पिढ्यानपिढ्या चालू असलेल्या ‘केदारनाथ बाजी’ या जागृत ग्रामदैवतेचा वैशिष्ट्य पूर्ण होलटे होमखेळाने रविवारी (ता. ५) शिमगोत्सवास प्रारंभ होणार आहे. प्रमुख खोत मंडळी ग्रामस्थ आपापल्या होळीवरून पेटते होलटे घेऊन देवाच्या फाका मारत, देवाची विशिष्ट फडाच्या जागेत येतात. हे पेटते होलटे पुन्हा एकत्र करून फडाच्या जागेला नतमस्तक होत रात्री १० वाजता होलटे होम पेटवून खेळला सुरवात केली जाते. ६ मार्चला रात्री १२ वाजता ग्रामस्थ आंब्याच्या झाडाची पूजा करून तोडण्यात येणार आहे. तोडलेले झाड सहाणेवर नाचत खेळत आणून विधीयुक्त पूजा करून पहाटे पाच वाजता उभे केले जाईल. ७ मार्चला सायंकाळी ६ दरम्यान सहाणेवर होम लावण्यात येणार आहे.