खेड ः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा होणार रेकॉर्डब्रेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा होणार रेकॉर्डब्रेक
खेड ः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा होणार रेकॉर्डब्रेक

खेड ः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा होणार रेकॉर्डब्रेक

sakal_logo
By

फोटो - उद्धव ठाकरे

खेडला आज धडधडणार उद्धव ठाकरेंची तोफ

माजी आमदार कदमांचा होणार प्रवेश; रेकॉर्ड ब्रेक गर्दीची शक्यता

खेड, ता. ४ ः शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रविवारी खेड येथे येत असून, हे त्यांच्या स्वागतासाठी भगवे झेंडे आणि रस्त्यारस्त्यावर स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंवर आरोप केले होते. याबाबत आणि शिवसेना हे नाव आणि चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची ही पहिलीच सभा असल्याने ते काय बोलणार, याची उत्सुकता आहे.
माजी आमदार संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशासाठी स्वतः उद्धव ठाकरे हे खेडमध्ये येत असून, रविवारी (ता. ५) मार्चला सायंकाळी ५ वाजता येथील गोळीबार मैदानात जाहीर सभेचे आयोजन केले आहे. ही सभा ऐतिहासिक व रेकॉर्डब्रेक व्हावी, असा आदेश मातोश्रीवरून दिला आहे. शिवसेना नेते माजी मंत्री अनंत गीते व आमदार भास्कर जाधव यांच्याकडे या सभेची जबाबदारी दिली आहे. संजय कदम यांना शिवसेनेत आणण्यासाठी आमदार भास्कर जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. स्थानिक पातळीवर पदाधिकारी कामाला लागले आहेत. जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण, तसेच गुहागर तालुक्यात विभागवार बैठका घेतल्या आहेत.
-------
चौकट
मैदानाची क्षमता सव्वालाखाची
खेडमधील गोळीबार मैदानावर होणाऱ्या या सभेसाठी ८० फूट लांब आणि ३० फूट रुंद, तसेच ८ फूट उंच असे भव्य व्यासपीठ उभारण्यात येत आहे. सव्वालाख लोक जमतील इतकी मैदानाची क्षमता असून, ३५ हजार खुर्च्या लावण्यात येणार आहेत. भारतीय बैठकीवर १५ ते १६ हजार शिवसैनिक बसणार आहेत. व्यासपीठावर शिवसेनेचे सर्व नेते, आजी-माजी आमदार, खासदार उपस्थित राहणार आहेत.
------------
कोट
लोकशाहीचा गळा घोटून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून शिवसेनेचे धनुष्यबाण काढून घेतले. त्यामुळे निष्ठावान शिवसैनिक पेटून उठला आहे. त्यांच्या मनात गद्दारांविषयी प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. तो आपल्या मनातील राग सभेला उपस्थित राहून काढेल. त्यामुळे शिवसेनेची ही सभा ऐतिहासिक होणार आहे.
- सचिन कदम, जिल्हाप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे