
रोणापालमधील अपघातग्रस्त विद्यार्थ्यास आर्थिक मदत
86933
रोणापाल ः सूरज गोठोस्कर या विद्यार्थ्याला मदत सुपूर्द करताना नाना सावंत आदी.
रोणापालमधील अपघातग्रस्त
विद्यार्थ्यास आर्थिक मदत
बांदा ः येथे दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या रोणापाल येथील सूरज गोठोस्कर या विद्यार्थ्याला डिंगणेचे माजी सरपंच तथा मडुरा माध्यमिक विद्यालयाचे लिपिक नाना सावंत यांनी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. यावेळी विद्यार्थ्याचे आईवडील तसेच प्रकाश गावडे, नागेश सावंत उपस्थित होते. सूरज याला राजीव गांधी विद्यार्थी योजनेतून अपघाताचे पैसे मिळवून देणार असल्याचे आश्वासन सावंत यांनी यावेळी गोठोस्कर कुटुंबीयांना दिले. बांद्यात आठ दिवसांपूर्वी अपघात होऊन सूरजच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याची आर्थिक स्थिती बेताची असल्याने समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी त्याला मदतीचा हात दिला आहे.
..................
मालवणात बुधवारी महिलांचा सन्मान
मालवण : महिला दिनाचे औचित्य साधून बुधवारी (ता. ८) येथील श्री शिवाजी वाचन मंदिर मालवणतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभाचे आयोजन सायंकाळी पाचला वाचन मंदिरच्या नव्या इमारतीत केले आहे. कार्यक्रमात रेवतळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका मेधा गोगटे, काळे आजी बालवाडी शिक्षिका संस्कृती बांदकर यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.