
दाभोळ-वाकवलीतील घरातून 28 हजाराचे दागिने लंपास
rat०४४०.txt
बातमी क्र. .४० (पान ३ साठी)
वाकवलीत दागिन्यांची चोरी
दाभोळ, ता. ४ ः दापोली तालुक्यातील वाकवली नवानगर येथील एका घरातून २८ हजार ९०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले असल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकवली नवानगर येथील शीतल बालाजी कांबळे यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. २ मार्चला सकाळी ९ ते सायं. ७.४५ पर्यंत त्यांचे पती दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याने घराला कुलूप होते. तसेच त्यांचे शेजारीही त्यांच्या घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. शीतल कांबळे दापोलीतून आल्यावर शेजाऱ्यांकडे गेल्या असता शेजाऱ्यांच्या घरातून कोणीतरी कपाटात ठेवलेले पैसे काढून घेऊन गेला असल्याचे त्यांना शेजाऱ्यांनी सांगितले. तेव्हा शीतल कांबळे या घरी गेल्या व त्यांनीही त्यांच्या घरातील लोखंडी कपाट उघडून पहिले असता त्यांना कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने दिसले नाहीत. त्यांच्या कपाटाजवळील स्लायडिंगची खिडकी उघडी असल्याचे त्यांना दिसले. आपले दागिने चोरीला गेल्याचे त्यांना समजताच त्यांनी दापोली पोलिस ठाण्यात जाऊन अज्ञाताविरोधात चोरट्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक निनाद कांबळे करत आहेत.
-