हत्ती प्रश्नीबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठक होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हत्ती प्रश्नीबाबत लवकरच
उच्चस्तरीय बैठक होणार
हत्ती प्रश्नीबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठक होणार

हत्ती प्रश्नीबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठक होणार

sakal_logo
By

हत्तीप्रश्नाबाबत लवकरच
उच्चस्तरीय बैठक होणार
दीपक केसरकरांचे वनमंत्र्यांना पत्र

सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ४ ः तालुक्यातील तिराळी खोऱ्यात हत्तींचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यासाठी तत्काळ हत्तीग्रस्त भागात उच्चस्तरीय बैठक घेण्यात यावी, असे पत्र शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. ही बैठक येत्या आठवड्यात होणार आहे.
दोडामार्गवासीयांना गेली वीस वर्षे हत्तीप्रश्न सतावत आहे. तिराळी खोरे हा तर हत्तींचा अधिवासच झाला आहे. हत्तींची उत्पत्तीही या ठिकाणी वाढत आहे. अन्नाच्या शोधात भटकणाऱ्या हत्तींचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हत्तीबाधित भागातील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका मांडत शासनाला हत्तींचा बंदोबस्त करता येत नसेल, तर आम्हाला बंदूका द्या, अशी मागणी केली. याबाबत ३० मार्चपर्यंत निर्णय न घेतल्यास वनविभाग कार्यालयासमोर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. या इशाऱ्याची स्थानिक आमदार तसेच शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी दखल घेतली. संबंधित अधिकारी तसेच हत्तीतज्ज्ञ अभ्यासक व ग्रामस्थ यांची तत्काळ बैठक बोलावून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, असे पत्र त्यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांना दिले आहे. दरम्यान, गंभीर स्वरूप धारण केलेल्या हत्तीप्रश्नी येत्या आठवड्यात बैठक बोलावणार आहोत. बैठकीत योग्य तोडगा काढून हत्तींचा बंदोबस्त करण्याची ग्वाही शिक्षणमंत्री केसरकर यांनी दिल्याची माहिती दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी दिली.