टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन

टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन

टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन

बुरंबाड मॉडर्न स्कूल ः लहान विद्यार्थ्यांचेही प्रयोग
संगमेश्वर, ता. ५ः यशवंत शिक्षण संस्था संचलित मॉडर्न इंग्लिश स्कूल बुरंबाड (ता. संगमेश्वर) येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित प्रदर्शनात टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवणे अशी थिम ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांनीही विविध प्रतिकृती तयार करून प्रदर्शनात ठेवल्या होत्या.
या कार्यक्रमाते उद्घाटन शाळा सल्लागार समितीचे सदस्य नितीन सागवेकर व नितीन कवळकर यांच्या उपस्थितीत झाले. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सीमी खोत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ. सी. व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनावर आधारित अनेक विचार मांडले. या दिवसाचा समारंभ साजरा करण्यासाठी प्रशालेत दरवर्षी विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या विज्ञान प्रतिकृतींचे प्रदर्शन आयोजित केले जाते. त्याप्रमाणे याहीवर्षी असे प्रदर्शन भरवण्यात आले होते. पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. व पाहुण्यांनी प्रदर्शनात ठेवलेल्या विज्ञान मॉडेल्स चा आस्वाद घेतला. यामध्ये सर्व विज्ञान प्रतिकृती या टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या होत्या. विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंचा उपयोग करून कॅलिडोस्कोप, पचनसंस्था, उत्सर्जन संस्था, फुप्फुसाचे कार्य , डी. एन.ए प्रतिकृती जलसुरक्षा प्रकल्प मॉडेल, वॉटर डिस्पेन्सर, ज्वालामुखी उद्रेक दाखविणारे मॉडेल, रोबोटिक आर्म इत्यादी प्रतिकृती सादर केल्या गेल्या. तसेच लहान वयोगटातील विद्यार्थ्यांनी विविध गमतीशीर छोटे प्रयोग सादर केले. नर्सरी व के.जी च्या विद्यार्थ्यांनी शरीराचे अवयव दाखविणे, विविध प्रकारच्या पानांचे प्रकार आदी गोष्टी सादर केल्या. काही विद्यार्थ्यांनी तक्ते तयार केले. विज्ञान रांगोळ्या व पुस्तक प्रदर्शन, विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध वस्तू ज्या टाकाऊ वस्तूंपासून बनवलेल्या होत्या, त्यांचे देखील प्रदर्शन ठेवण्यात आल्या होते. शाळेतील विज्ञान शिक्षक सचिन भरड तसेच विज्ञान शिक्षिका कु. कीर्ती दामले, शाळेतील सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका ऋतुजा धामणस्कर यांनी, तर छायाचित्रण शिक्षक ओंकार मोहिते यांनी केले.


चौकट

सोप्या शब्दात दिली माहीती
प्रदर्शनात संपूर्ण दिवस विज्ञान गीतांचे बोल ऐकू येत होते. हे प्रदर्शन पाहायला येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना साध्या सोप्या शब्दात प्रत्येक विद्यार्थी आपले मॉडेल समजावून सांगत होता. प्रदर्शन पहायला येणाऱ्यांनी त्या विद्यार्थ्याचे कौतुक केले व उत्तम अभिप्राय दिले. उपस्थित प्रमुख पाहुणे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सिमी खोत, सहाय्यक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com