संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

शिवसेना महिला आघाडीमध्ये
चिपळूणातील कार्यकर्त्यांचा प्रवेश
चिपळूण : तालुक्याच्या ग्रामीण व शहर विभागातील अनेक महिला कार्यकर्त्यांनी शिवसेना महिला आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये स्नेहा पेवेकर, सारिका कांबळी, आरती शेखर महाडिक, साक्षी संतोष लोटेकर, स्वाती सुभाष कदम, स्नेहा गणेश मोरे, माधुरी पालशेतकर, रसिका राजेश जुवळे, सिद्धी गणेश जुवळे, सिद्धी गणेश भालेकर, भाग्यश्री नितीन चोरगे, तृप्ती सुधीर कदम यांचेसह त्यांच्या सहकारी यांचा समावेश आहे. या सर्व प्रवेश कर्त्या महिला कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांचे शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेमध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी सौ. सीमा चव्हाण, महिला आघाडी जिल्हा संघटक रश्मी गोखले, तालुका संघटक सुप्रिया सुर्वे, शहरप्रमुख महम्मद फकीर, महिला आघाडी शहर संघटक प्राजक्ता टकले, युवासेना शहरप्रमुख विनोद पिल्ले, अंकुश आवले, महिला आघाडी शहर समन्वयक तेजस्विता साटम, उपशहर संघटक संगीता हुंमरे आदी उपस्थित होते.

नेवरे ग्रामपंचायतीतर्फे महिला दिनानिमित्त कार्यक्रम
रत्नागिरी : जागतिक महिला दिनाचे आैचित्य साधून बुधवारी (ता. ८) नेवरे ग्रामपंचायत कार्यालय येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ वा वित्त आयोग २०२०-२१ ‘आमचा गांव आमचा विकास’ व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान (उमेद), जिल्हा परिषद शाळा नेवरे, न्यू इंग्लिश स्कूल नेवरे, आरोग्य उपकेंद्र नेवरे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळी १० वाजता महिला प्रबोधन रॅली, १०.३० वाजता नेत्र तपासणी, ११ वाजता स्वागत समारंभ व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा, दुपारी १२.३० वाजता सुरेखा जोशी यांचे ‘महिला सबलीकरण’ विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. दुपारी २.३० वाजता महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व भगिनीनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच दिपक फणसे यांनी केले आहे.

----------

दापोली कोकण कृषि विद्यापीठाच्या
सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचार्‍यांचा सत्कार
रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरु असून कुलगुरु डॉ. संजय सावंत यांच्या संकल्पनेतून विद्यापीठातील सर्व सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या रत्नागिरीतील झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात गेल्या ५० वर्षात सेवानिवृत्त झालेले शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यासाठी कुलगुरु डॉ. संजय सावंत व संशोधन संचालक डॉ. संजय भावे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याचे उद्घाटन माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. प्रकाश शिनगारे उपस्थित होते. सेवानिवृत्त डॉ. शेखर कोवळे, डॉ. विजय जोशी, डॉ. विट्ठल जोशी, डॉ. मनोहर चांडगे, सुरेश पवार, एकनाथ पंड्ये, विजय शिंदे, विरकुमार शेट्ये, रामभाऊ पालशेतकर हे उपस्थित होते. यावेळी कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. माजी संशोधन केंद्र प्रमुख आणि वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. विजय जोशी आणि मत्स्यालय टाकी परिचर एकनाथ पंड्ये यांनी आपल्या कार्यकाळातील कामाची आठवण करून दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे सहाय्यक संशोधन अधिकारी कल्पेश शिंदे यांनी केले.