‘मी भारतीय’ नाट्यप्रयोगातून स्वातंत्र्यपूर्व काळाचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मी भारतीय’ नाट्यप्रयोगातून
स्वातंत्र्यपूर्व काळाचे दर्शन
‘मी भारतीय’ नाट्यप्रयोगातून स्वातंत्र्यपूर्व काळाचे दर्शन

‘मी भारतीय’ नाट्यप्रयोगातून स्वातंत्र्यपूर्व काळाचे दर्शन

sakal_logo
By

87149
नांदगाव ः ‘मी भारतीय’ या दीर्घांकाचे प्रमुख रवींद्र देवधर यांना सन्मामित करताना नागेश मोरये.
(छायाचित्र : एन. पावसकर)


‘मी भारतीय’ नाट्यप्रयोगातून
स्वातंत्र्यपूर्व काळाचे दर्शन

नांदगावात स्वा. सावरकर, कुसुमाग्रजांना वंदन

तळेरे, ता. ५ : नांदगाव येथे वैश्यवाणी समाजाच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतिदिन आणि कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषद नांदगाव शाळा क्र. १ च्या सभागृहात ‘मी भारतीय’ हा दीर्घांक नाट्यप्रयोग रवींद्र देवधर आणि ॠषिकेश कानडे यांनी सादर केला. या प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कुसुमाग्रज यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. हा नाट्यप्रयोग सर्व ग्रामस्थांना स्वातंत्र्यपूर्व काळात घेऊन गेला. नाट्यप्रयोग वैश्यवाणी समाज, नांदगाव या संस्थेने विनाशुल्क आयोजित केला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नागेश मोरये, नाट्य संकल्पनेचे प्रमुख रवींद्र देवधर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी खजिनदार मारुती मोरये, सल्लागार आणि वृत्तनिवेदक गजानन रेवडेकर, कलाकार ॠषिकेश कानडे, सल्लागार राजेंद्र मोरजकर, सचिव ॠषिकेश मोरजकर, सरपंच रविराज मोरजकर, दशरथ मोरये, महादेव मोरये आदी उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.