रस्त्यात सापडलेले पाकीट मूळ मालकास केले परत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्यात सापडलेले पाकीट
मूळ मालकास केले परत
रस्त्यात सापडलेले पाकीट मूळ मालकास केले परत

रस्त्यात सापडलेले पाकीट मूळ मालकास केले परत

sakal_logo
By

87154
मडुरा ः आमडोस्कर यांना पाकीट परत करताना बांद्यातील युवक.

रस्त्यात सापडलेले पाकीट
मूळ मालकास केले परत
बांदा, ता. ५ ः मडुरा येथील रुपेश आमडोस्कर यांचे रस्त्यात पडलेले पैसे व महत्त्वाची कागदपत्रे असलेले पाकीट बांदा शहरातील युवकांना निगुडे येथे सापडले. त्यांनी आधारकार्डवरील पत्ता शोधून आमडोस्कर यांच्या निवासस्थानी जाऊन पाकीट परत केले. युवकांच्या या प्रामाणिकपणाचे आमडोस्कर यांच्यासह ग्रामस्थांनी कौतुक केले.
शहरातील युवक आदिल आगा, मुसा आगा, सोहेल जामदार, तुषार मांजरेकर, अदनान खतीब, रघुवीर सातोसकर हे शिरोडा येथे क्रिकेट स्पर्धेसाठी गेले होते. आज सायंकाळी ते बांदा येथे परतत असताना बांदा-मडुरा रस्त्यावर निगुडे येथे पडलेले पाकीट आढळले. त्यांनी उघडून बघितले असता आतमध्ये रोख अडीच हजार रुपये व महत्त्वाची कागदपत्रे आढळली. युवकांनी आधारकार्डवरील पत्त्यावर आमडोस्कर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पाकिट परत केले. उपसरपंच जावेद खतीब यांनी युवकांचे कौतुक केले.