
rat0524.txt
पान ३ साठी
नाणीज-शिवगणवाडी येथे दारू विक्रीवर कारवाई
रत्नागिरी ः तालुक्यातील नाणीज-शिवगणवाडी येथील काजूच्या बागेत हातभट्टी दारुची विक्री करणाऱ्या विरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश शिवराम शिवगण (वय ५६, रा. नाणीज-शिवगणवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ४) दुपारी दीडच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित गावठी हातभट्टी दारू विक्री करत असताना सापडला. या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार मोहन कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.
गणपतीपुळेत समुद्रकिनारी मृतदेह
रत्नागिरी ः तालुक्यातील गणपतीपुळे येथील एमटीडीसी बांबू हाऊस समोरील समुद्रकिनारी अनोळखी पुरुषाचे प्रेत आढळले. मात्र तपासात मिरकरवाडा येथील खलाशाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही घटना शनिवारी (ता.४) सायंकाळी चारच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खबर देणार यांना बांबू हाऊस येथे काम पहात असताना समोरील समुद्रकिनारी पुरुषाचा मृतदेह अंदाजे वय ४० ते ४५ समुद्राच्या लाटाबरोबर वाहत आल्याने व त्याची ओळख पटत नसल्याचे पोलिस ठाण्यात सांगितले. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता तो मृतदेह मिरकरवाडा येथील रघुनाथ दास (वय ४५, मूळ ः ओडीसा. सध्या, मिरकरवाडा, रत्नागिरी) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुण्यातील दोघे अपघातात जखमी
रत्नागिरी ः पुण्यातून दुचाकीवरुन श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे येणाऱ्या दोन तरुणांचा गणपतीपुळे पेट्रोलपंप रस्त्यावर अपघात झाला. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असून अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. भास्कर भारंमवार (वय २३, रा. पुणे) व संकेत अरविंद लांडे (वय २२, रा. आंबेगाव, पुणे) अशी अपघातात जखमींची नावे आहेत. ही घटना रविवारी (ता. ५) सकाळी साडेसातच्या सुमारास गणपतीपुळे पेट्रोल पंप रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोघेही पुण्यातून दुचाकीवरून गणपतीपुळे येथे येत होते. रात्री पुण्यातून ते निघाले होते. सकाळी त्यांचा अपघात गणपतीपुळे पेट्रोलपंप रस्त्यावर घडला. मात्र अपघात कसा घडला अथवा कुणी ठोकर दिली याबद्दल माहिती मिळू शकली नाही दोघे गंभीर जखमी असल्याने त्यांना अधिक उपचारसाठी रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.