झाराप येथील वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झाराप येथील वृद्धाची
गळफास घेऊन आत्महत्या
झाराप येथील वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

झाराप येथील वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या

sakal_logo
By

झाराप येथील वृद्धाची
गळफास घेऊन आत्महत्या
कुडाळ, ता. ५ ः तालुक्यातील झाराप-कुंभारवाडी येथील जयराम रामचंद्र कुडाळकर (वय ६५) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.
कुडाळकर हे काल (ता. ४) रात्री जेवण झाल्यावर झोपले होते. त्यानंतर ते राहत असलेल्या घरातील ओट्याजवळील छपराच्या लोखंडी अॅंगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत सकाळी नातेवाईकांच्या निदर्शनास आले. याबाबतची माहिती कुडाळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. याबाबतची खबर सदानंद रामचंद्र कुडाळकर यांनी कुडाळ पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. याबाबतचा अधिक तपास हेडकॉन्स्टेबल हनुमंत धोत्रे करीत आहेत.