ढेकणं चिरडायला तोफ नको, बोटाचीच गरज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढेकणं चिरडायला तोफ नको, बोटाचीच गरज
ढेकणं चिरडायला तोफ नको, बोटाचीच गरज

ढेकणं चिरडायला तोफ नको, बोटाचीच गरज

sakal_logo
By

८७१८४, ८५, ८६, ८७, ८८,८९, ९०

पान १

खेड ः येथील गोळीबार मैदानावर झालेल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे.

मैदानावर उपस्थित शिवसैनिक
उद्धव ठाकरे आणि व्यासपीठ


पाशवी शक्तीला २०२४ मध्ये गाडायचेय
उद्धव ठाकरे; खेडच्या गोळीबार मैदानातून घातली मतदारांना साद
खेड, ता. ५ ः मैदानाचे नाव चांगले आहे, गोळीबार मैदान. शिवसेनाप्रमुख सांगत ढेकणं चिरडायला तोफ नको. गोळीबार करायची गरजच नाही. ती आता रक्त पिऊन फुगलेली आहेत. त्यांना चिरडण्यासाठी बोटच पुरे आहे. एक बोट मतदानाच्या दिवशी दाबलंत तरी बास. ज्यांना कुटुंबीय मानले, ज्यांना मोठे केले त्यांनीच आईवर वार केला आहे. शिवसेना आमची आई आहे. ही चार अक्षरे नसती तर काय झाल असते, असे खणखणीत प्रतिपादन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले.
शिवसेना चिन्ह आणि धनुष्यबाण पक्षाच्या हातातून गेल्यानंतर राज्यातील उद्धव यांची ही पहिली जाहीर सभा. खेड येथे रामदास कदम यांच्या मतदारसंघातील गोळीबार मैदानावर प्रचंड उपस्थितीत ही सभा झाली. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात दोन आमदार फुटले. रामदास कदम यांचा हा बालेकिल्ला. तेथेच जाहीर सभा घेत ठाकरे यानी रणशिंग फुंकताना शिवसैनिकांना भावनिक साद घातली.
ठाकरे म्हणाले, ‘‘स्वातंत्रलढ्याची सुतराम माहिती नसलेल्या पाशवी शक्तीला २०२४ च्या निवडणुकीत गाडायचे आहे. भारतमातेला पुन्हा गुलामगिरीच्या साखळीत अडकू देणार नाही. २०२४ ची लोकसभा निवडणूक शेवटची ठरेल. भविष्यात तुम्हाला मतदानाचा अधिकार राहणार नाही. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हेतर संपूर्ण हिंदुस्तानात भगवा फडकू द्या. दीडशे वर्ष गुलामगिरीत असलेल्या देशाला स्वातंत्र्यसैनिकांनी आपले रक्त सांडून स्वतंत्र केले. त्या देशाला पुन्हा गुलामगिरीत टाकायचे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात भाजपची गुलामगिरी आम्ही चालवून घेणार नाही. आज माझ्याकडे द्यायला काहीच नाही. तुम्ही मला साथ देणार का. आमच्याबरोबर आला तर घरादारावर छापे पडू शकतात. आज आणि आता सर्वांनीच ठरवायचे आहे. उद्यापासून शिमगा आहे. तेव्हा काही जण बोंबलणार आहेत. काहींचा जन्मच शिमग्यात झाला आहे; पण लक्षात ठेवा धूळवडीनंतर रंगपंचमी आहे. ज्यांना आजपर्यंत दिले. तुम्ही मोठे केले तरीही ते खोक्यात बंद झाले. माझे हात रिकामे आहेत, तरीही तुम्ही आले आहात. आज मी तुमच्याकडे मागायला आलो आहे. तुमची साथ सोबत पाहिजे, ते भुरटे चोर गद्दार आहेत. त्यांना सांगायचं आहे, तुम्ही शिवसेना नाव चोराल; पण शिवसेना चोरू शकत नाही. धुनष्य चारेलेत म्हणजे पेलवेल, असे नाही. रावण उताणा पडला तिथे मिंधे काय करणार. ते गावागावांत गेले आले. मोतिबिंदू झाला नसेल तर शिवसेना पाहायला या.’’
निवडणूक आयोगाबाबत ते म्हणाले, ‘‘हा चुना लगाव आयोग आहे. सत्तेचे गुलाम आहेत. वरून हुकूम येताता तसे वागत आहेत. निवडणूक आयोगात राहायचे लायक नाहीत. ज्या तत्त्वावर शिवसेना त्यांची असे सांगितले. शिवसेनेची स्थापना माझ्या वडिलांनी केली आहे. आयोगाचे वडील वरती बसले असतील पण ते माझे नाहीत तुमचे आहेत. ते शिवसेना फोडत नाहीत, तर मराठी माणसाच्या, हिंदूंच्या एकजुटीवर घाव घालत आहेत. कोण विचारत नव्हते भाजपला, तेव्हा शिवसेनाप्रमुख मागे राहिले नसते तर हे कुठे असते. आता निष्ठूरपणाने वागत आहेत. त्याना संपवा. आयोगाचा फैसला आम्हाला मान्य नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत.’’
खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, माजी मंत्री सुभाष देसाई, माजी मंत्री आमदार रवींद्र वायकर, विधान परिषद विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, माजी खासदार अनंत गीते, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, आमदार राजन साळवी, माजी मंत्री आमदार अनिल परब, माजी खासदार चंद्रकांत खैरे, मराठा नेते केशवराव भोसले, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्यासह मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


रावण उताणा पडला...
ठाकरे म्हणाले, ‘‘लहानपणापासून शिवसेनाप्रमुखांच्या सभा ऐकत आलो आहे. शिवतीर्थावर मातीत बसून सभा पाहिल्या आहेत. देवमाणसांचे दर्शन आणि आशीर्वाद घ्यायला आलो आहे. ज्यांना आजपर्यंत दिले. तुम्ही मोठे केले तरीही ते खोक्यात बंद झाले. माझे हात रिकामे आहेत, तरीही तुम्ही आला आहात. आज मी तुमच्याकडे मागायला आलो आहे. तुमची साथ सोबत पाहिजे, ते भुरटे चोर गद्दार आहेत, त्यांना सांगायचं आहे. तुम्ही शिवसेना नाव चोराल, पण शिवसेना नाही चोरू शकत. धुनष्य चारेलेत म्हणजे पेलवेल असे नाही. रावण उताणा पडला तिथे मिंधे काय करणार.’’

मी सावध करायला आलोय
जागतिक कीर्तीवर आपले कौतुक झाले. पंतप्रधानांचे झाले नाही; पण मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे, जनतेचे झाले. मृतदेहाची विटंबना झाली नव्हती. योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात झाले. मी तुम्हाला सावध करायला आलो आहे. उद्योग येत होते, सगळे गुजरातला गेले. आयफोनचा कारखाना कर्नाटकला. तिथे निवडणुका येणार आहेत. महाराष्ट्राला कंगाल करून टाकायचा आणि तुटक्या बसवर गतिमान महाराष्ट्र लिहिले जाते, असा शालजोडीतला ठाकरेनी हाणला.


राजनच घर किती बाय किती फूट
आमदार राजन साळवी आणि वैभव नाईक यांची काय संपत्ती आहे. जागतिक स्तरावर घोटाळा झाला त्यांची चौकशी सोडून यांच्या मागे लागले आहेत. दुःख एवढंच आहे. राजनचं घर किती फूट बाय किती फूट आहे. त्यांच्यावर ज्या पद्धतीने कारवाई झाली, ते देशद्रोही आहेत का. राजन साळवी तुम्ही काळजी करू नका. जे आज तुमची चौकशी करत आहेत, त्यांचे दिवस फिरल्यानंतर त्यांच्या घरादाराचे काय हाल होतील, याचा त्यांनी विचार करावा, असा इशारा देतानाच ठाकरे यांनी साळवींना दिलासाही दिला..