
खो-खो स्पर्धेवर ठाणे जिल्ह्याची मोहोर
rat०७२३.TXT
बातमी क्र.. २३ (टुडे ३ साठी)
- rat७p१०.jpg-
८७३१८
चिपळूण ः खो-खो स्पर्धेतील विजेते, उपविजेता संघातील खेळाडू.
खो-खो स्पर्धेवर ठाणे जिल्ह्याची मोहोर
डेरवण युथ गेम्स ः निखिल सोडये, पायल भाणगे अष्टपैलू
खेड, ता. ७ ः डेरवण येथे सुरू असलेल्या डेरवण युथ गेम्स २०२३ स्पर्धेत चौथ्या दिवशी खो-खोमध्ये १४ वर्षांखालील मुलांच्या गटात विहंग-ठाणे मुलींच्या गटात रा. फ. नाईक, ठाणे या संघांनी तर १८ वर्षाखालील गटात मुलांमध्ये शिर्सेकर-मुंबई तर मुलींच्या गटात ज्ञानविकास-ठाणे संघांनी विजेतेपद पटकावले.
श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीजने आयोजित केलेल्या डेरवण युथ गेम्स स्पर्धेत आज झालेले अंतिम फेरीचे अत्यंत चुरशीचे आणि प्रेक्षकांना लुब्ध करणारे ठरले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. या वेळी छत्रपती पुरस्कार विजेते जगदीश नाणजकर उपस्थित होते. चार गटातील विजेत्या संघांना रोख रक्कम, चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. १४ वर्षाखालील मुलांच्या अंतिम सामन्यात विहंग, ठाणे संघाने ज्ञान्न विकास, ठाणे संघावर १०-९ असा १ गुणाने निसटता विजय मिळवला. या सामन्यात आशिष गौतम आणि कारण गुप्त यांनी विजयात मोलाचा वाट उचलला. ज्ञानविकास संघाकडून तन्मय घोरपडेने विजयासाठी पराकाष्ठा केली. मुलींच्या अंतिम सामन्यात रा. फ.नाईक संघाने ज्ञानविकास संघाचा १६-३ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. नाईक संघाकडून आदिती दौडकरने उत्कृष्ट आक्रमण तर आणि प्रणिती जगदाळेने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन केले. ज्ञानविकास संघाकडून धनश्री कंकने अतिशय उत्तम संरक्षण केले. १८ वर्षाखालील मुलांच्या गटात शिर्सेकर, मुंबई संघाने क्रीडा निकेतन, पुणे संघाचा ११-७ असा १ डाव ४ गुणांनी सहज पराभव केला. रामचंद्र झोरेने चांगले संरक्षण करून तर निखिल सोडयेने अष्टपैलू खेळ करत विजयात मोलाचा वाट उचलला. क्रीडा निकेतन संघाकडून सागर सगटने चांगला खेळ केला. मुलींचा अंतिम सामन्यात ज्ञानविकास, ठाणे संघाने वॉरिअर संघाचा पराभव करत १०-८ असा २ गुण आणि २.१० मिनिटे राखून जिंकला. ज्ञानविकासची विद्या गायकवाड उत्कृष्ट संरक्षक तर वॉरिअर संघाची स्नेहल चव्हाण उत्कृष्ट आक्रमक ठरली. ज्ञानविकासच्या पायल भाणगेने अष्टपैलू खेळाडूचा पुरस्कार पटकावला.
-
बास्केटबॉलमध्ये सातारा विजयी
बास्केटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात १५ वर्षाखालील एनबी हुप्स, सातारा संघाने विजेतेपद तर बालाजी विद्यालय, किळापूर संघाने उपविजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात कोरे स्पोर्टस, कोल्हापूर विजेता तर गुरूकूल, सातारा संघ उपविजयी ठरला. १८ वर्षाखालील मुलांच्या गटात पी. टाऊन, पुणे संघाने स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावताना चॅलेंज क्लब, कोल्हापूर संघाचा पराभव केला. चॅलेंज क्लब संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ छत्रपती पुरस्कारप्राप्त जगदीश नाणजकर, पुणे यांच्या हस्ते झाला. या वेळी बॅडमिंटन प्रशिक्षक आनंद चितळे उपस्थित होते.