सायकलदूत पुरस्काराने गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायकलदूत पुरस्काराने गौरव
सायकलदूत पुरस्काराने गौरव

सायकलदूत पुरस्काराने गौरव

sakal_logo
By

rat०७१९.txt

बातमी क्र.. १९ (टुडे पान ३ साठी)

- rat७p१५.jpg-
८७३३६
देवळे ः सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे सायकलदूत पुरस्कार गजानन भातडे यांना प्रदान करताना उदय लोध. सोबत कौस्तुभ सावंत, युयुत्सू आर्ते, सुहास ठाकूरदेसाई आदी.
(मकरंद पटवर्धन ः सकाळ छायाचित्रसेवा)

सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे सायकलदूत पुरस्कार

देवळे येथे कार्यक्रम ः आलेकर बंधूंनी वर्चस्व गाजवले

रत्नागिरी, ता. ७ ः सुवर्णसूर्य फाउंडेशनने यंदा प्रथमच तिसऱ्या रत्नागिरी सायक्लोथॉनमध्ये सायकलदूत पुरस्कार देऊन ज्येष्ठ व युवा सायकलपटूंचा सन्मान केला. कायम सायकल प्रसार, प्रचार करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. देवळे येथे रंग अवधूत महाराज मठाच्या आवारात हा कार्यक्रम झाला. यंदा सायकलदूत पुरस्कार प्रसाद आलेकर (चिपळूण), श्रद्धा रहाटे, गजानन भातडे, नीलेश शाह (सर्व रत्नागिरी) आणि प्रशांत पालवणकर (दापोली) यांना गौरवण्यात आले.
या कार्यक्रमात डबल एसआर (सुपर रॅंडोनिअर) झालेले रत्नागिरीतील सायकलपटू अमित कवितके यांचाही गौरव करण्यात आला. रत्नागिरीत गेल्या पाच वर्षांत सायकलिंगचे प्रमाण बऱ्यापैकी वाढले आहे. रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, चिपळूण, दापोली व खेड येथील सायकल क्लबच्या माध्यमातून गेली दोन वर्षे सायकल संमेलनही होत आहे. सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे तिसऱ्या वर्षी रत्नागिरी सायक्लोथॉनचे आयोजन केले. पहिल्या वर्षी सायक्लोथॉन हेदवी ते गणपतीपुळे, दुसऱ्या वर्षी रत्नागिरी ते चाफे कातळशिल्प आणि यंदा आध्यात्मिक प्रचारासाठी सायक्लोथॉन आयोजित केली. यंदाच्या स्पर्धेत वय वर्ष ११ ते ७२ या वयोगटातील महिला, पुरुषांनी भाग घेतला. पहिल्या वर्षीपासून रत्नागिरी सायक्लोथॉनवर आलेकर बंधूनी वर्चस्व गाजवले आहे. चिपळुणातील विक्रांत व प्रसाद या दोघा बंधूंनी तिन्ही वर्षे पहिला क्रमांक सोडला नाही. आजच्या स्पर्धेत आकाश व सांगलीच्या शिंदे यांनी आलेकर बंधूंसोबत सायकलिंग करत आव्हान दिले; परंतु अनुभवी व कसबी आलेकर बंधूंनी पहिला व चौथा क्रमांक या स्पर्धेत पटकावला. याबद्दल आलेकर बंधूंचे कौतुक करण्यात आले.