
पंतवालावलकर महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन
87394
देवगड ः येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
पंतवालावलकर महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन
देवगड, ता. ७ ः येथील शिक्षण विकास मंडळ या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त न. शा. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयात बारावी वैद्यकीय प्रयोगशाळा तत्रंज्ञच्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर काय, याअंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सहकार्यवाह विश्वामित्र खडपकर, प्रभारी प्राचार्या सुखदा जांबळे, पर्यवेक्षक शरद शेटे तसेच अन्य शिक्षक उपस्थित होते. पर्यवेक्षक शेटे यांनी प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या व्यावसायिक प्रशिक्षणाची माहिती दिली. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त संस्थेने व्यावसायिक प्रशिक्षणाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ४० हजाराची शिष्यवृत्ती जाहीर केली आहे असून त्याचीही माहिती दिली. बी. व्होक प्रशिक्षणामधील आरोग्याची काळजी (हेल्थ केअर) या पदवीमध्ये कोणता अभ्यासक्रम आणि प्रात्यक्षिक घेतले जाते आणि ही पदवी घेतल्यानंतर मुख्य परिचारिका अधिकारी, अतिदक्षता परिचारिका अधिकारी, सहायक परिचारिका अधिकारी, परिचारिका पर्यवेक्षक अथवा व्यवस्थापक आदी पदांवर नोकरी करण्याची संधी मिळेल. तर शासकीय व खासगी दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एन.जी.ओ.मध्ये कामाची संधी उपलब्ध होते, असे स्पष्ट केले. शेटे यांनी आभार मानले.