रत्नागिरी ः ...तिने महिलांपुढे ठेवला स्वसंरक्षणाचा वेगळा आदर्श | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः ...तिने महिलांपुढे ठेवला स्वसंरक्षणाचा वेगळा आदर्श
रत्नागिरी ः ...तिने महिलांपुढे ठेवला स्वसंरक्षणाचा वेगळा आदर्श

रत्नागिरी ः ...तिने महिलांपुढे ठेवला स्वसंरक्षणाचा वेगळा आदर्श

sakal_logo
By

महिला दिन विशेष
rat७p४६.jpg- KOP२३L८७४७९ रत्नागिरी - मार्शलआर्ट तायक्वांदो ट्रेनिग सेंटरच्या महिला प्रशिक्षक शशीरेखा राम कररा.
------------

शशीरेखाने महिलांपुढे ठेवला स्वसंरक्षणाचा आदर्श

ब्लॅक बेल्ट विजेत्या ; तायक्वांदो ट्रेनिग सेंटरमध्ये प्रशिक्षिका
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः महिलाना कोणताही छंद लग्न होईपर्यंत जोपासणे शक्य होतं. त्यानंतर मात्र संसाराचा गाडा हाकताना छंद जोपासण्यासाठी उसंतच मिळत नाही; मात्र आंध्रप्रदेशातील एका महिलेने या परंपरेला छेद देत रत्नागिरीत करिअर घडवले. शशीरेखानी ब्लॅक बेल्टचे प्रशिक्षण घेऊन मार्शलआर्ट तायक्वांदो ट्रेनिग सेंटर सुरू केले. एवढेच नाही तर फ्री स्टाईल पुमसे या प्रकारात सुवर्णपदक मिळवलं. पतीसह सासरच्या लोकांच्या पाठबळावर आंध्रप्रदेशातील या रणरागिणीने इतर महिलांपुढे स्वसंरक्षणाचा आदर्श ठेवला आहे. शशीरेखा राम कररा, असे त्यांचे नाव आहे.
लग्न झाल्यानंतर एखादी स्त्री स्वसंरक्षणाचा क्रीडाप्रकार तायक्वांदोचं प्रशिक्षण घेते आणि त्यात ब्लॅक बेल्टही होते, हे हटके चित्र आहे.नावाप्रमाणे शशीरेखाने आपल्या कर्तृत्वाच्या यशोरेखा चढत्या ठेवल्या आहेत. शशीरेखा राम कररा या मुळच्या आंध्रप्रदेश अमलापूरमच्या. शशीरेखा लग्न होऊन अलोरे (ता. चिपळूण) गावात आल्या. घरात संपूर्ण खेळाचं वातावरण. कानावर पडणारा प्रत्येक शब्द तायक्वांदो खेळाचाच. तिनेही या खेळाचं प्रशिक्षण घ्यायचा मनात निश्चय केला. त्यांचे मोठे दीर व्यंकटेश कररा यांच्या प्रोत्साहनाने अलोरे इथे लक्ष्मण आणि प्रसाद कररा यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांसोबत कमरेला व्हाईट बेल्ट बांधून प्रशिक्षण घ्यायला सुरवात केली. त्या ब्लॅक बेल्टदेखील झाल्या. आज त्या रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथे मार्शलआर्ट तायक्वांदो ट्रेनिग सेंटरमध्ये महिला प्रशिक्षिका म्हणून काम करत आहेत.
२०१० मध्ये त्यांचा हा धाडसी प्रवास सुरू झाला. आज वयाच्या ३२व्या वर्षी दोन मुली उपर्जना आणि रूही यांच्यासह त्या या खेळात सक्रिय आहेत. त्यांनी जिल्हास्तरीय क्योरोगी अर्थात फाईट स्पर्धेत रौप्य पदक मिळवले तर जळगाव येथे झालेल्या ३२वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर तायक्वांदो अजिंक्यपद फ्री स्टाईल पुमसे या प्रकारात सुवर्णपदक मिळालं. पुमसे म्हणजे फाईट खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत हालचाली. यात उत्तम प्रावीण्य मिळवले. त्यांनी या खेळासाठी असणारी राज्य पंच परीक्षाही त्या उत्तमप्रकारे यशस्वी झाल्या.निश्चय केला तर विवाहित महिलादेखील आपल्या छंद जोपासत करिअर करू शकते हे दाखवून दिले.


कोट...
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, अस म्हटलं जातं; मात्र माझ्यामागे पती राम कररा यांच्यासह दीर, जावा, कुटुंबातील अन्य सदस्य ठामपणे उभे आहेत. त्यांच्या पाठिंब्याने आणखीन यशोशिखर गाठण्याची माझी जिद्द आहे.
-शशीरेखा राम कररा, मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिग सेंटरच्या प्रशिक्षिका