हक्कासाठी संघर्षाचीही तयारी ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हक्कासाठी संघर्षाचीही तयारी ठेवा
हक्कासाठी संघर्षाचीही तयारी ठेवा

हक्कासाठी संघर्षाचीही तयारी ठेवा

sakal_logo
By

87609
फोंडाघाट ः येथील महाविद्यालयातर्फे प्रा. राजश्री बेळेकर यांचे स्वागत करण्यात आले.

हक्कासाठी संघर्षाचीही तयारी ठेवा
---
प्रा. राजश्री बेळेकर; फोंडाघाट येथे जागतिक महिला दिन
फोंडाघाट, ता. ८ ः ‘शारीरिक सौंदर्य खुलविण्यापेक्षा बौद्धिक व्यक्तिमत्त्व फुलवा. पार्लरमधला वेळ व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी खर्च करा. त्यामुळेच दुसरे आपला आदर्श घेतील. स्वतःचे संरक्षण करण्याची धमक तुमच्यात ठेवा. त्यासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता असते. ती तयारी आपण ठेवली पाहिजे, तरच महिला दिन साजरा करण्याचा आपल्याला अधिकार आहे,’ असे परखड मत प्रा. राजेश्री बेळेकर यांनी व्यक्त केले.
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात प्रा. बेळेकर बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘एकोणिसाव्या शतकापर्यंत मतदानाचा अधिकार नव्हता. अमेरिकेत असोसिएशन स्थापन करण्यात आली; परंतु ती वर्णद्वेषी होती. भारताचा विचार केला तर आजच्या काळातही स्त्री सुरक्षित नाही. कोणतेही दृश्य स्वरूपात दिन साजरे करण्यापेक्षा त्या दिनाचे विचार आत्मसात करावेत. जिजाऊंच्या मुली या तलवारीच्या बाण्या असल्या पाहिजेत.’
प्राचार्य डॉ. विष्णू फुलझेले म्हणाले, की समाजात वावरताना निडरपणे वागले पाहिजे. मारेन किंवा मरेन या तत्त्वाने वागले पाहिजे. स्त्री मुक्तीच्या चळवळीत खूप बदल होत गेले. वयाच्या २१ व्या वर्षी महात्मा फुले यांनी १७ वर्षांच्या सावित्रीमाईंच्या मदतीने महिलांसाठी शाळा सुरू केली. धर्मांधांना ती मोठी चपराक होती. जगातल्या पुढारलेल्या देशांतही महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. ‘समान काम- समान वेतन’ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची देणगी आहे. त्यामुळे स्त्रीच्या समानतेत फार फरक पडला. विभागप्रमुख डॉ. विद्या मोदी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. नम्रता मंचेकर यांनी आभार मानले.