
‘महिला मिनी मॅरेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
87652
मालवण ः महिला मिनी मॅरेथॉन स्पर्धेतील विजेते.
‘महिला मिनी मॅरेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
मालवणात उपक्रम; ग्लोबल रक्तदाते, रक्तविरांगनाचा पुढाकार
मालवण, ता. ७ : ग्लोबल रक्तदाते मालवण सिंधुदुर्ग, ग्लोबल रक्तविरांगना मालवण यांच्यावतीने आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या ‘महिला मिनी मॅरेथॉन’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. येथील हॉटेल मालवणी कोळंब व मंगलमूर्ती स्कुबा डायविंगतर्फे पुरस्कृत ही स्पर्धा मालवण रेवतळे सागरी महामार्ग येथे झाली. स्पर्धेत विविध गटांत दिव्या मंडलिक, स्नेहा खवणेकर, अनुष्का कदम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित ही स्पर्धा उत्साहात पार पडली.
‘रन फॉर हेल्थ’, हा संदेश घेऊन धावणाऱ्या सर्व गटातील स्पर्धकांनी दोन किलोमीटर अंतर पार केले. १६ ते ३० वयोगटात दिव्या मंडलिक, ३१ ते ४५ वयोगटात स्नेहा खवणेकर यांनी प्रथम क्रमांक पटकवला. तर ४५ वर्षांवरील खुल्या गटाच्या चालण्याच्या स्पर्धेत अनुष्का कदम यांनी बाजी मारली. तिन्ही वयोगटात एकूण १४२ महिलांनी सहभाग दर्शविला. मालवण देऊळवाडा येथून सागरी महमार्ग ते कोळंब पुल या मार्गावर एकूण २ किलोमीटर अंतरासाठी ही स्पर्धा झाली. यामध्ये १६ ते ३० व ३१ ते ४५ या दोन वयोगटासाठी धावणे तर ४५ वर्षावरील खुल्या गटासाठी चालण्याची स्पर्धा घेण्यात आली. प्राध्यापिका सुविधा तिनईकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेते व उत्तेजनार्थ क्रमांक स्पर्धकांना गौरविण्यात आले. सर्व सहभागींना प्रमाणपत्र व मेडल दिले. यावेळी काढलेल्या लकी ड्रॉमधील विजेत्या विजया कांदळगावकर, मनाली दळवी, दीपा वनकुद्रे यांना भेटवस्तू देण्यात आली. ज्येष्ठ नागरिक पद्मजा वझे, पोलिस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, प्रा. तिनईकर, लायन्स क्लब अध्यक्ष वैशाली शंकरदास, सचिव अनुष्का चव्हाण, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका मेघना जोशी, प्रा. सुमेधा नाईक, सौ. वेंगुर्लेकर, कोळंबच्या सरपंच सीया धुरी, शिक्षिका सारिका शिंदे आदी उपस्थित होत्या. अजय शिंदे यांनी स्पर्धेचे सूत्रसंचालन केले. स्पर्धा आयोजन व यशस्वीतेसाठी नेहा कोळंबकर, राजा शंकरदास, राधा केरकर, बंटी केरकर, रेनोल्ड बुतेलो, संदीप पेडणेकर, अमेय देसाई, गणेश कोळंबकर, उत्तम पेडणेकर, दीपक ढोलम, रश्मीन रोगे, विकास पांचाळ, राजू बिडये, रुपा बिडये, ललित चव्हाण, कोमल चव्हाण, समृद्धी धुरी, प्रियल लोके, गंगाराम आडकर आदींनी सहकार्य लाभले.
...............
चौकट
स्पर्धेचा निकाल असा
१६ ते ३० वयोगट-दिव्या मंडलिक, अक्षता मालंडकर, निळा धुरी, सीमा खरवते, उत्तेजनार्थ- महिमा मोहिते, अनुष्का आंबेरकर, श्रेया आंबेरकर, सानिका तारी, स्नेहल परब, सान्वी नलावडे. ३१ ते ४५ वयोगट-स्नेहा खवणेकर, पद्मिनी मयेकर, सुचिता तायशेटे, नैना तळगावकर, उत्तेजनार्थ-नीलम प्रसन्नकुमार मयेकर, ऑल्विना रईस, राणी पराडकर, गार्गी ओरसकर, दिव्या कोचरेकर, साक्षी मयेकर. खुला गट (चालणे)-अनुष्का कदम, ऋतुजा वारिशे, विजया कांदळगावकर, साक्षी वर्दम, उत्तेजनार्थ-वृषाली सापळे, तेजल वेंगुर्लेकर, वैष्णवी सारंग, मनाली इब्रामपूरकर, सुनीता जाधव, मेघना जोशी.