आदर्श महिला कर्मचारी पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदर्श महिला कर्मचारी पुरस्कार
आदर्श महिला कर्मचारी पुरस्कार

आदर्श महिला कर्मचारी पुरस्कार

sakal_logo
By

rat०८१७.txt

बातमी क्र..१७ (पान २ साठी)

फोटो ओळी
- ratchl८१.jpg ः
८७६४०
चिपळूण ः आदर्श कर्मचारी मनिषा कांबळी यांचा सन्मान करताना प्रा. प्रणिता घाडगे, सोबत महिला शिक्षिका.
--
मनिषा कांबळी ठरल्या आदर्श महिला कर्मचारी

चिपळूण ः सह्याद्री शिक्षणसंस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) प्राथमिक विद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला. महिलादिनाचे औचित्य साधून दरवर्षी आदर्श महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जातो. यावर्षी ज्येष्ठ शिक्षिका मनिषा कांबळी यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन आदर्श महिला कर्मचारी म्हणून सन्मान केला. कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हा सचिव प्रणिता घाडगे, पालक-शिक्षक संघाच्या सदस्या वेदिका महाडीक, माता-पालक संघाच्या सदस्या स्वाती मोहिते, शिशूविहारच्या मुख्याध्यापिका ममता ठसाळे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांनी आदर्श महिला कर्मचाऱ्यांचे नाव जाहीर केले. त्यानुसार कांबळी यांचा सन्मान झाला. या सोबत शाळेतील सर्व महिला कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. या वेळी विद्यालयाच्या शिक्षिका रश्मी राजेशिर्के व वृषाली राणे यांनी मनोगतातून महिला दिनाविषयी मार्गदर्शन केले.
---

युथ गेम्समध्ये सातजणांना सुवर्णपदक

खेड ः कोकण ऑलिम्पिक डेरवण युथ गेम्समध्ये जलतरण स्पर्धेत शौर्य आचरेकर, निधी सामंत, फ्रेया शाह, आर्यवीर पाटील, आत्मजा सहाणे, शाल्व मुळे व तिविशा दीक्षित यांनी आपापल्या प्रकारात सुवर्णपदक जिंकले. श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज् ट्रस्ट क्रीडासंकुलात जलतरण स्पर्धा उत्साहात झाली. स्पर्धेत विविध जिल्ह्यांमधील जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी नोंदवत पदके जिंकली. जलतरण स्पर्धेचा अंतिम निकाल २०० मीटर वैयक्तिक मेडले (१२ वयोगट मुले) शौर्या आचरेकर, केतन वर्मा, विहान सराफ. मुलींचा गट निधी सामंत, काव्या रिसबूड, आसावरी मोरे. २०० मीटर वैयक्तिक मेडले (१० वयोगट मुली) फ्रेया शाह, सम्राज्ञी जोशी, अनिशा काळे. २०० मीटर वैयक्तिक मेडले (१६ वयोगट मुले) आर्यवीर पाटील, सोहम साळुंके, प्रज्योत गायकवाड, मुलींचा गट आत्मजा सहाणे, तन्मयी जाधव, श्रीया खवळे. २०० मीटर वैयक्तिक मेडले (१४ वयोगट मुले) शाल्व मुळे, नील बऱ्हाणपूरकर, रूद्र बच्छाव. मुलींचा गट तिविशा दीक्षित, ओवी सहाणे, पूर्वा शिंदे.
-
फोटो ओळी
-rat८p१५.jpg ः
87735
राजापूर ः राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष हनिफ काझी, उपाध्यक्ष प्रसाद मोहरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना राष्ट्रवादीचे सचिव अजित यशवंतराव.
--
हनिफ काझी, प्रसाद मोहरकरांना शुभेच्छा
राजापूर ः राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्षपदी सहकार पॅनेलचे हनिफ काझी, उपाध्यक्षपदी प्रसाद मोहरकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अजित यशवंतराव यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी बँकेचे संचालक जयंत अभ्यंकर, संजय ओगले, राजेंद्र कुशे, अ‍ॅड. शशिकांत सुतार, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे आदी उपस्थित होते.
--
फोटो ओळी
- rat८p१६.jpg ः
८७६५७
सुलतान ठाकूर
---
राजापूर शिक्षण सोसायटीच्या अध्यक्षपदी ठाकूर

राजापूर ः राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटी राजापूरच्या अध्यक्षपदी सुलतान ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली आहे. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या सभेमध्ये ही निवड करण्यात आली. या सभेमध्ये ठाकूर यांची पाच वर्षासाठी अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दवल ठाकूर यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
---

फोटो ओळी
- rat८p१४.jpg ः
८७६५६

देवरूख ः कॅरमचे विजेतेपद पटकावणाऱ्या गुंजन खवळेला सन्मानित करताना मान्यवर.
-----------
कॅरम स्पर्धेत गुंजन खवळेला विजेतेपद

साडवली ः डेरवण युथ गेम्स २०२३ मधील कॅरम एकेरी स्पर्धेचे (१६ वर्षांखालील मुली) अंतिम विजेतेपद देवरूखच्या गुंजन खवळे हिने प्राप्त केले. या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सलग तिसऱ्यावेळी विजेतेपद प्राप्त करण्याची कर्तबगारी गुंजनने केली आहे. गुंजनला आई-वडिलांसह संगमेश्वर तालुका कॅरम असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभत आहे. ती सध्या देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्व. अरूंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नववीमध्ये शिकत आहे.
--