आदर्शगाव बनवण्याचा भडेवासियांचा संकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आदर्शगाव बनवण्याचा भडेवासियांचा संकल्प
आदर्शगाव बनवण्याचा भडेवासियांचा संकल्प

आदर्शगाव बनवण्याचा भडेवासियांचा संकल्प

sakal_logo
By

rat८p२६.jpg-
८७६९३
भडे (ता. लांजा)ः आदर्श गाव संकल्पासाठी भडे येथे गावभेट कार्यक्रमाला उपस्थित समितीचे पदाधिकारी व कृषी विभागाचे अधिकारी.
-----------
भडे आदर्शगाव बनविण्याचा संकल्प
अनुसया संस्थेचा पुढाकार; गावभेट कार्यक्रमात सर्वांशी संवाद
पावस, ता. ८ः लांजा तालुक्यातील भडे हे आदर्श गाव बनवण्याचा संकल्प सभेमध्ये केला आहे. यासाठी कृषी विभागाकडून पुढाकार घेतला आहे. आदर्श गाव संकल्प व पुणे येथील प्रकल्प समितीतर्फे भडे येथे कृषी विभागाकडून विशेष ग्रामसभा गावभेट कार्यक्रम आयोजित केला होता.
या सभेला कृषी उपसंचालक सुरेश भालेराव यांनी मार्गदर्शन केले. विशेष ग्रामसभेत ७ ते ८० वर्षांपर्यंत विद्यार्थी, कॉलेजमधील तरुण-तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, वृद्ध नागरिक यांच्याशी ग्रामसभेत चर्चा झाली. भडे गावातून लेझिम पथकासह तसेच लहान विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतमातेची वेशभूषा केलेल्या बालदोस्तांचा सहभाग असलेली छोटी फेरी काढण्यात आली. यामध्ये ग्रामस्थही सहभागी होते. याचे आयोजन भडे ग्रामस्थ व अनुसया महिला स्वयंसेवी संस्थेने केले होते. हा कार्यक्रम आदर्श शाळा नं. १ येथे झाला. या सभेमधील ग्रामस्थांना हिवरे बाजारचे आदर्श सरपंच डॉ. पद्मश्री पोपटराव पवार यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले. त्यांनी भडे गावातील ग्रामस्थांचे अभिनंदन करून प्राथमिक स्तरावर भडे आदर्शगाव म्हणून जाहीर केला.

चौकट
आदर्श सप्तसुत्रीची अंमलबजावणी हवी
चराईबंदी, कुर्‍हाडबंदी, नसबंदी, नशाबंदी, श्रमदान, बोअरबंदी, लोटाबंदी या सप्तसुत्रीच्या माध्यमातून आदर्श गाव निवडण्यात येते. या गावाचा सर्वांगीण विकास साधणे व गाव स्वयंपूर्ण करणे हीच आदर्श गाव योजनेची खरी संकल्पना आहे. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळेच गावाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. त्यासाठी गावकर्‍यांनी आदर्श सप्तसुत्री प्रभावी अंमलबजावणी करत जलव्यवस्थापन, वनव्यवस्थापन, समाज व्यवस्थापन, सुयोग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे.