
अभिषेक बालविकास वर्गाचे कासार्डेत पारितोषिक वितरण
87751
कासार्डे ः अभिषेक बालविकास वर्गाच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर नादकर यांनी मार्गदर्शन केले. (छायाचित्र : एन. पावसकर)
अभिषेक बालविकास वर्गाचे
कासार्डेत पारितोषिक वितरण
तळेरे, ता. ८ : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांसोबत पालकांनीही प्रयत्नशील राहावे. यासाठी अभिषेक बालविकास वर्ग सातत्याने प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रभाकर कुडतरकर यांनी काढले. कासार्डे येथे आयोजित ज्ञानशशी लीलावती एज्युकेशन ट्रस्ट संचलित अभिषेक बालविकास वर्गाच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर नादकर, संस्थेचे खजिनदार भाग्यश्री नादकर, सचिव देवेंद्र देवरुखकर, वर्षाराणी केंद्रे, नितीन भैसारे, कोमल पिसे, कासार्डे वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. सिद्धेश डिगसकर, प्रशालेच्या प्राचार्या सौ. देवरुखकर आदी उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. अभिषेक बालविकास वर्गाकडून देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त रंगभरण, धावणे, चमचा लिंबू, लगोरी टिपणे, पाण्यात नाणे टाकणे आदी स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना गौरविण्यात आले. प्रशालेस सातत्याने मदत करणारे पालक नीलेश पाटील, शैलेश चव्हाण, पराग मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. भास्कर नादकर यांनी स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांचा पाया मजबूत होणे गरजेचे आहे. हे काम बालविकास प्रशालेत केले जाते, असे सांगितले. प्रशांत पाताडे, वसंत आडीवरेकर, ज्ञानेश्वर बांदिवडेकर, दीपक पाताडे यांच्यासह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. सौ. देवरुखकर यांनी प्रास्ताविक केले. देवेंद्र देवरुखकर यांनी सूत्रसंचालन तर वर्षाराणी केंद्रे यांनी आभार मानले.