रोटरी क्लबतर्फे मालवणात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरी क्लबतर्फे मालवणात 
कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
रोटरी क्लबतर्फे मालवणात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

रोटरी क्लबतर्फे मालवणात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

sakal_logo
By

८७६८०


रोटरी क्लबतर्फे मालवणात
कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ८ : जागतिक महिला दिनानिमित्त येथील रोटरी क्लबच्या वतीने ब्यूटी पार्लर व हेअर ड्रेसर्स व्यवसायात नावलौकिक मिळविलेल्या उद्योजिका पूनम मिठबावकर व सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या शिल्पा खोत यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सौ. मिठबावकर यांनी मुंबई येथून हेयर ड्रेसर्सचा डिप्लोमा पूर्ण करून मालवणात २००९ मध्ये अद्ययावत सोयींनी सुसज्ज असे लेडीज परी पार्लर सुरू केले. ग्राहकांचा वाढता ओघ पाहून २०२१ मध्ये पुरुष आणि स्त्रियांकरिता एकत्रित पार्लर सुरू केले. आज मालवणसह जिल्ह्यात त्यांनी या व्यवसायात नावलौकिक मिळविला आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे भरीव योगदान आहे. सौ. खोत समाजकार्यासह महिला सबलीकरणामध्ये अग्रेसर आहेत. महिलांना एकत्र करून रक्तदान शिबिर, नारळ लाढविणे स्पर्धा, होम मिनिस्टर स्पर्धा, स्वच्छता मोहिमा असे उपक्रम त्या राबवत असून स्वराज्य महिला ढोल पथकाची सुरुवात देखील त्यांनी केली. या कार्याबद्दल या दोघांना रोटरी क्लबतर्फे गौरविण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष रतन पांगे, सुहास ओरसकर, महेश काळसेकर, अनिल देसाई, प्रसन्न मयेकर, उमेश संगोडकर, सुविधा तिनईकर, रमाकांत वाक्कर, संदेश पवार, रंजन तांबे आदी उपस्थित होते.