मोबाईल टॉवर बंदमुळे गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल टॉवर बंदमुळे गैरसोय
मोबाईल टॉवर बंदमुळे गैरसोय

मोबाईल टॉवर बंदमुळे गैरसोय

sakal_logo
By

87761
कणकवली : येथील अधिकाऱ्यांना कळसुलीवासीयांना निवेदन दिले. यावेळी कल्पेश सुद्रिक आदी.


मोबाईल टॉवर बंदमुळे गैरसोय

कळसुलीतील समस्या; संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन

कणकवली, ता.८ : कळसुली (ता.कणकवली) येथील बीएसएनएलचे दोन्ही टॉवर वारंवार बंद पडत असल्‍याने मोबाईल ग्राहकांची गैरसोय होत आहे. त्‍यामुळे येथील टॉवरची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी पंच सदस्य कल्‍पेश सुद्रीक यांनी केली. याबाबतचे निवेदन त्‍यांनी आज उपमंडल अधिकारी योगेश भागवत यांना दिले.
निवेदनात म्‍हटले की, कळसुली गावात हर्डी आणि प्राथमिक आरोग्‍य केंद्र येथे बीएसएनएलचे टॉवर आहेत. गावात अन्य कंपन्यांचे नेटवर्क नाही. त्‍यामुळे हे टॉवर बंद झाल्‍यानंतर ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, रेशन दुकान, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, बँक, पोस्ट आदींमधील कामकाज ठप्प होत आहे. तसेच ग्राहकांचीही मोठी गैरसोय होत आहे. कळसुली गावची लोकसंख्या साडे तीन हजार आहे. त्‍यामुळे येथील टॉवरची तातडीने दुरूस्ती करावी. दरम्‍यान, बीएसएनएलचे उपमंडल अधिकारी योगेश भागवत यांनी कळसुलीतील विस्कळीत मोबाईल सेवेची तक्रार तातडीने दूर केली जाईल, अशी ग्‍वाही दिल्‍याची माहिती श्री.सुद्रीक यांनी दिली. दरम्यान, यावेळी माजी तंटामुक्ती अध्यक्ष चंदू परब, राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस रुझाज फर्नांडीस, मोहित सावंत, अक्षय मुरकर आदी उपस्थित होते.