386 कासवाची पिल्ले समुद्रात झेपावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

386 कासवाची पिल्ले समुद्रात झेपावली
386 कासवाची पिल्ले समुद्रात झेपावली

386 कासवाची पिल्ले समुद्रात झेपावली

sakal_logo
By

rat०८२६.txt

बातमी क्र..२६ (पान ३ साठी, मेन)

फोटो ओळी
-rat८p३४.jpg-
८७७२८
रत्नागिरी ः मालगुंड कासव संवर्धन केंद्रातील ५ घरट्यांमधील कासवाची पिल्लं सुरक्षित काढण्यात आली.
-rat८p३५.jpg-
८७७२९
किनाऱ्यावरून ही पिल्लं समुद्रात झेपावत असतानाचा आनंद घेताना वनाधिकारी, प्राणीमित्र, पर्यटक, ग्रामस्थ आदी.
--

३८६ कासवाची पिल्ले झेपावली समुद्रात

मालगुंड केंद्रात पाच घरटी ; चार वर्षांनंतर पुन्हा कासव संवर्धन

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ८ ः तालुक्यातील मालगुंड कासव संवर्धन केंद्रामधील पाच घरट्यातील ३८६ ऑलिव्ह रिडले कासवाची पिल्ले आज सुरक्षितपणे किनाऱ्यावर सोडण्यात आली. काही मिनिटात हे छोटेसे जीव समुद्राच्या पाण्यात झेपावले. चार वर्षांनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात कासवाची पिल्ले या किनाऱ्यावरून सोडण्यात आली. अजूनही मोठ्या प्रमाणात घरटी असून त्यांचे योग्य पद्धतीने संवर्धन केले जात आहे.
ऑलिव्ह रिडले प्रजातीची कासवं अंडी घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोकण किनाऱ्यावर येत आहेत. अगदी गुहागरपासून ते रत्नागिरीतील गणेशगुळे, मालगुंड किनाऱ्यापर्यंत कासवांची ही घरटी दिसतात. वनविभागासह अनेक प्राणी, कासवप्रेमी कासवांच्या या घरट्यांचे संरक्षण व संवर्धन करत आहेत. आज सकाळी मालगुंड कासव संवर्धन केंद्रातील कासवांच्या अंड्यांमधून अनेक पिल्ली बाहेर पडली. घरटे क्र. ४ मधील १५१ अंड्यांपैकी १११ पिल्लं सोडण्यात आली. घरटे क्र. ५ मधील १४७ अंड्यांमधील ९५ पिल्ले, ६ मधील १२७ अंड्यांपैकी ८६ पिल्ले, ७ मधील ८६ अंड्यांपैकी ८३ पिल्ले तर घरटे क्र. ८ मधील ५८ अंड्यापैकी ४१ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. एकूण ५ घरट्यांमधील ३८६ कासवांची पिल्ले सकाळी समुद्रात सुखरूप सोडण्यात आली. हा कार्यक्रम विभागीय वनाधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दि. पो. खाडे, सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.). रत्नागिरी (चिपळूण) व परिक्षेत्र वनाधिकारी, रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. संवर्धन करतेवेळी जिल्हा नियोजन अधिकारी सूर्यकांत मुळ्ये, सरपंच मालगुंड श्वेता शेऊर, वनपाल पाली गावडे, कासव मित्र ऋषिराज जोशी, रोहित खेडेकर, ग्रामस्थ सुबोध साळवी व पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-
दोन महिन्यात ४ हजार ८०० अंड्यांचे संवर्धन
मालगुंड आणि गणपतीपुळे किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. २ जानेवारीला पहिले कासव मालगुंड येथे अंडी घालण्यासाठी आले होते. त्यानंतर आतापर्यंत ४६ घरटी कासवांनी बनवली. त्यामध्ये सुमारे ४ हजार ८०० अंड्यांचे संवर्धन करण्यात आले आहे. यासाठी मालगुंड येथील ॠषिराज जोशी आणि रोहित खेडेकर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेतात.
------
कोट
येथील किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर कासव संवर्धन होत आहे. त्यासाठी कासवमित्रांना लागेल ती मदत करणार आहे. यामधून पर्यटनाला चालना देण्यासाठीही प्रयत्न करू.
--राजू शिंदे, मालगुंड