रेल्वे स्थानकावरील रिक्षा व्यावसायिकांना दणका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे स्थानकावरील रिक्षा व्यावसायिकांना दणका
रेल्वे स्थानकावरील रिक्षा व्यावसायिकांना दणका

रेल्वे स्थानकावरील रिक्षा व्यावसायिकांना दणका

sakal_logo
By

rat०८४१.txt

बातमी क्र. ४१ (पान ३ साठी)

फोटो ओळी
- rat८p४०.jpg-
८७७९०
रत्नागिरी ः शिमगोत्सवानिमित्त आरटीओमार्फत राबविण्यात आलेली विशेष तपासणी मोहिम
--

रेल्वे स्थानकावरील रिक्षा व्यावसायिकांना दणका

५० जणांवर कारवाई ; वारेमाप भाडे आकारून लूट

रत्नागिरी, ता. ८ : शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करडी नजर ठेवत कारवाई करण्यात आली. रेल्वे स्टेशनला गेली आठ दिवस ही पथके २४ तास कार्यरत आहेत. यामध्ये चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, रिक्षा व्यावसायिकांकडून वारेमाप भाडे आकारुन त्यांची लुट थांबविण्याचे आणि शिस्त लावण्याचे काम आरटीओंच्या पथकाने केले. यामध्ये वेगवेगळया नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ५० जणांवर कारवाई करण्यात आली.
शिमगोत्सवानिमित्त कोकण रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी व इच्छीत ठिकाणी रिक्षाने योग्य दरात पोचण्यासाठी परिवहन विभाग रत्नागिरी मार्फत गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी रेल्वे स्थानक व परिसर येथे २४ तास विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. परिवहन विभाग रत्नागिरी मार्फत अधिकृत दरपत्रक तसेच तक्रार निवारणासाठी दूरध्वनी क्रमांक बाबतचे जनजागृती फलक रेल्वे स्थानक परिसरात लावण्यात आले आहेत. सदर मोहिमेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंती चव्हाण व सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयातील सर्व मोटर वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अविनाश मोराडे, श्री जाधव आदींनी सहभाग नोंदवला.