मालवणात एनसीसी विद्यार्थ्यांचे ''मशाल ट्रेकिंग'' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवणात एनसीसी विद्यार्थ्यांचे ''मशाल ट्रेकिंग''
मालवणात एनसीसी विद्यार्थ्यांचे ''मशाल ट्रेकिंग''

मालवणात एनसीसी विद्यार्थ्यांचे ''मशाल ट्रेकिंग''

sakal_logo
By

swt९८.jpg
८७८९०
मर्ढेः जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या मशाल ट्रेकिंगचे ग्रामपंचायतीक़डे स्वागत करण्यात आले.

मालवणात एनसीसी विद्यार्थ्यांचे ''मशाल ट्रेकिंग''
महिलादिनाचे औचित्य ः १८ किलोमीटर अंतर मशालीसह पायी चालत पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ९ : जागतिक महिलादिनाचे औचित्य साधत येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागामार्फत सिंधुदुर्ग किल्ल्यापासून भरतगड किल्ल्यापर्यंत महिला सक्षमीकरण मशाल पेटवून १८ किलोमीटर अंतर मशाली घेऊन चालत पूर्ण करण्यात आले.
सकाळी सिंधुदुर्ग किल्ला बंदर जेटी येथे ज्योती तोरसकर, योगा ग्रुप सदस्या अनुष्का चव्हाण या महिलांच्या हस्ते मशाली प्रज्वलित करून डॉ. शिवराम ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ट्रेकिंग कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य ठाकूर व कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी चंद्रशेखर कुशे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. योगा ग्रुप सदस्य व श्रीमती सुरत यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर किल्ल्यापासून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर कॉलेजच्या सर्व प्राध्यापकांनी व अन्य कर्मचाऱ्यांनी ट्रेकिंग रॅलीचे स्वागत केले.
कांदळगावमध्ये आल्यानंतर श्री रामेश्वर मंदिराचे पुजारी विठू गुरव व त्यांचे वडील यांनी मशाल ट्रेकिंग कॅम्पचे स्वागत करून प्रसाद दिला. सिंधुदुर्ग किल्ला ते भरतगड किल्ला १८ किलोमीटर अंतर चालून पूर्ण केल्यानंतर मर्ढे ग्रामपंचायत सरपंच संदीप हडकर, ग्रामसेवक शंकर कोळसुलकर, मंडळ अधिकारी एस. आर. चव्हाण, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर या सर्वांनी या ट्रेकिंग कॅम्प व मशालींचे स्वागत केले. सर्वांनी मनोगते व्यक्त केली. यामध्ये एनसीसी विभागाचा व एनसीसी विद्यार्थ्यांचा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल गौरव करण्यात आला. त्यानंतर मशाली घेऊन भरतगडावर सर्वजण दाखल झाले. त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना एनसीसी विभागामार्फत भोजन व्यवस्था करण्यात आली होती. अशा रीतीने ट्रेकिंग कॅम्पचे विसर्जन झाले. एकूण १८ किलोमीटर अंतर एनसीसी विद्यार्थ्यांनी पायी चालत मशाली घेऊन मशाली सक्षमीकरणाच्या घोषणा देत पूर्ण केले. या कार्यक्रमाचे आयोजन एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत, एनसीसी सीनियर नारायण मुंबरकर, प्रीती बांदल, तेजस पोळ, मिथिल मोरवेकर, तृप्ती माडये, सिद्धी कुमठेकर, अर्जुन मालवणकर, बिरू खरात यांनी केले. या ट्रेकिंगमध्ये ५० एनसीसी कॅडेट्स सहभागी होते.
लेफ्टनंट प्रा. डॉ. खोत यांनी एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मिलिटरी, तटरक्षक दल पोलिस भरती, एअर फोर्स, नेव्ही रिलायन्स उद्योग, महाराष्ट्र कॅडेट फोर्स, पेरॅमिलीटरी व वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा यामध्ये एनसीसी विद्यार्थ्यांना सवलती दिल्या जातात. तसेच प्रथम प्राधान्य दिले जाते असे सांगितले. या कॅम्पमध्ये कॉलेजचा विद्यार्थी प्रतिनिधी ओंकार यादव तसेच सूरज शिवगण सहभागी होते.