मालवण येथे 25 ला आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवण येथे 25 ला आरोग्य शिबिर
मालवण येथे 25 ला आरोग्य शिबिर

मालवण येथे 25 ला आरोग्य शिबिर

sakal_logo
By

swt९५.jpg
87887
मालवणः सकल भंडारी हितवर्धक संस्थेच्या बैठकीत आरोग्य शिबिराची माहिती देण्यात आली.

मालवण य़ेथे २५ ला आरोग्य शिबिर
सर्वधर्मियांसाठी उपक्रम ः सकल भंडारी संस्थेचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ९ : सकल भंडारी हितवर्धक संस्थेच्यावतीने सीमा भगवान ऊर्फ नाना करंजे, राजश्री नारायण आचरेकर, दीपक बळवंत मयेकर यांच्या स्मरणार्थ सर्वधर्मियांसाठी २६ मार्चला सकाळी ९ ते ४ या वेळेत भंडारी हायस्कूल येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याची माहिती काल (ता. ८) झालेल्या बैठकीत देण्यात आली.
शिबिरात मधुमेह व अंतस्त्राव विज्ञान नलिका रोगतज्ज्ञ डॉ. अमित भोंडवे, दंतरोगतज्ज्ञ डॉ. नीलम भोंडवे, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संदीप गव्हाळे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रुतिका गव्हाळे, बालरोगतज्ज्ञ डॉ. श्रीकांत जमदाडे, आयुर्वेद डॉ. अमृता जमदाडे, अंतर्गत औषध चिकित्सक डॉ. कौशिक कुलकर्णी, सामान्य चिकित्सक डॉ. अपूर्वा कुलकर्णी, त्वचारोगतज्ज्ञ डॉ. अतुल डोंगरे, डॉ. गायत्री गुंड, डॉ. महुवा बिंदल, कान, नाक, घसा रोगतज्ज्ञ डॉ. निनाद ब्रम्हानंदन, डॉ. धनश्री ब्रम्हानंदन, डॉ. रिया मारिया, जठरात्रमार्ग रोगतज्ज्ञ डॉ. चेतन, डॉ. गोविंद, डॉ. प्रभू, डॉ. निखिल, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब दिवेकर, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दिवेकर, रक्त तपासणीस भाटिया, नेत्रचिकित्सक अनिल सुभेदार, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. संजना उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहेत.
शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपली नावे २३ मार्चपर्यंत हर्षद नाईक, नीलेश गवंडी, बाबू परुळेकर, पंकज पेडणेकर, शैलेश मुणगेकर, यशवंत मिठबावकर, सुनील नाईक, भंडारी पतपेढी, प्रदीप वेंगुर्लेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी भाई गोवेकर, प्रमोद करलकर, मिलिंद झाड, अजय मुणगेकर, राजन पांजरी, सचिन गवंडे, रमण वाईरकर, अजित गवंडे, आनंद तोंडवळकर, प्रदीप वेंगुर्लेकर, अरुण दुधवडकर, प्रकाश करंगुटकर, मोहन वराडकर, पंकज पेडणेकर, जयप्रकाश परुळेकर, शैलेश मुणगेकर, चंदन पांगे, भाऊ साळगावकर आदी उपस्थित होते.
...............