संज्योक्ती सुर्वे, विद्या पटवर्धन यांना बोडस ट्रस्टचे पुरस्कार प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संज्योक्ती सुर्वे, विद्या पटवर्धन यांना बोडस ट्रस्टचे पुरस्कार प्रदान
संज्योक्ती सुर्वे, विद्या पटवर्धन यांना बोडस ट्रस्टचे पुरस्कार प्रदान

संज्योक्ती सुर्वे, विद्या पटवर्धन यांना बोडस ट्रस्टचे पुरस्कार प्रदान

sakal_logo
By

rat०९१५.txt

बातमी क्र. १५ (टुडे पान २ साठी)

फोटो ओळी

- rat९p२.jpg-
८७८४३
रत्नागिरी : बोडस चॅरिटेबल ट्रस्टतर्फे विद्या पटवर्धन यांना पुरस्कार देताना उदय बोडस व खजिनदार ॲड. आदिती पटवर्धन पहिल्या छायाचित्रात तर दुसऱ्या छायाचित्रात संज्योक्ती सुर्वे यांना पुरस्कार देताना श्री. बोडस. सोबत धरमसी चौहान आणि डॉ. श्रीरंग कद्रेकर.

सुर्वे, पटवर्धन यांना बोडस ट्रस्टचे पुरस्कार

रत्नागिरी, ता. ९ : बोडस चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रत्नागिरी शहरातील विद्या मधुकर पटवर्धन यांना कर्तव्यनिष्ठ पुरस्कार, तर संज्योक्ती संजय सुर्वे यांना कार्यगौरव पुरस्कार महिला दिनाचे औचित्य साधून प्रदान करण्यात आला.
गेली १० वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अप्रकाशित व्यक्ती आणि विशेष कार्य करणाऱ्या संस्था यांना विविध पुरस्कार देणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्टने २०२२ चे कर्तव्यनिष्ठा आणि कार्यगौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पाच आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रथमच एका वर्षी तीन महिलांना सन्मानित करण्यात येत आहे. कर्तव्यनिष्ठा पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र आणि एक पुस्तक, तर कार्यगौरव पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र आणि ३ हजार रुपये असे आहे. रत्नागिरीत सुमारे चार दशके अग्निहोत्रविषयक कार्य करणाऱ्या आणि कर्मयोगिनी अशी ओळख असलेल्या विद्या पटवर्धन यांना कर्तव्यनिष्ठा पुरस्कार आज वितरित केला. मरीन सिंडिकेट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका आणि तीन बंदरांत थेट जहाजावर जाऊन काम करणाऱ्या पहिल्या महिला अशा रत्नागिरी शहरातील अष्टपैलू संज्योक्ती सुर्वे यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कर्तव्यनिष्ठा पुरस्कार व्यसनमुक्त गाव तुरळ (संगमेश्वर) येथील सामजिक कार्यकर्ते कृष्णा हरेकर यांना दिला जाणार आहे. शिरोडा (ता. वेंगुर्ले) येथील माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयातील कलाशिक्षक बाळासाहेब पाटील, भिंगळोली (ता. मंडणगड) येथे ग्रामीण भागातून सलग पाच वर्षे १ कोटी रुपयांपेक्षा जास्त अल्पबचत गोळा करणाऱ्या नीलम जोशी आणि पाणथळ आणि पडीक जमिनीत उन्हाळी शेतीचा यशस्वी प्रयोग गेली २१ वर्षे करणारे चिंचघर-प्रभुवाडी (ता. खेड) येथील संजय पायरे यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.