ःचिपळूण शहरातील मॉडेल रस्ता ठप्पच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ःचिपळूण शहरातील मॉडेल रस्ता ठप्पच
ःचिपळूण शहरातील मॉडेल रस्ता ठप्पच

ःचिपळूण शहरातील मॉडेल रस्ता ठप्पच

sakal_logo
By

rat९१८.txt

फोटो - ratchl८४.jpg- KOP23L87985

चिपळूण ः गेल्या ५ वर्षापासून रखडलेला स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल दरम्यानचा रस्ता

चिपळूण शहरातील मॉडेल रस्ता ठप्पच

भूमीपूजनला झाली पाच वर्षे ; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ९ ः शहरातील मार्कंडी येथील स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल या रस्त्याचे पाच वर्षापुर्वीच तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात भूमीपूजन झाले. मात्र गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत या रस्त्याचे काम मार्गी लागलेले नाही. शहरातील मॉडेल रस्ता म्हणून हा रस्ता करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार कामाला सुरवात करावी. तसेच कामाला विलंब करण्यास कारणीभूत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली.
स्वामी मठ ते महाराष्ट्र हायस्कूल रस्ता रूंदीकरण व डांबरीकरण कामाचे ७ डिसेंबर २०१८ ला भूमीपूजन झाले होते. शहरातील एकमेव असा दुपदरी रस्ता दर्जेदार आणि शहराच्या इतिहासातील मॉडेल रस्ता होईल, अशी ग्वाही तत्कालीन नगराध्यक्षांनी दिली होती. भूमिपूजनानंतर काही दिवसातच रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. मात्र प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर कामात अनेक त्रुटी जाणवू लागल्या. मोठ्या मोऱ्या टाकणेचे काम या अंदाजपत्रकात समाविष्ट केलेले नव्हते. वस्तुस्थितीची पाहणी न करताच रस्त्याचे अंदाजपत्रक बनविण्यात आले. परिणामी कामास सुरवात झाल्यानंतर मुळ अंदाजपत्रकात मोठ्या प्रमाणात बदल व दुरुस्ती करावी लागली. तरीही ५ वर्षापुर्वी सुरू झालेले काम ५० टक्के ही पुर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे यास जबाबदार असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्या विरुध्द कारवाई व्हावी. सबंधीत ठेकेदाराजवळ केलेल्या करारापत्रानुसार १ वर्ष मुदतीत पुर्ण करावयाचे काम ५ वर्षानंतरही पूर्ण झालेले नाही. रस्त्याचे पुन्हा नव्या दमाने काम सुरू होण्यासाठी अधिकाऱ्यांची मानसिकता नाही. पुर्वीच्या अंदाजपत्रकात मोऱ्यांची कामे नव्हती. आती ती कामे झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामास सुरवात व्हायला हरकत नाही. प्रशासकीय हलगर्जीपणामुळे मुळ ठेकेदार दरवाढीची मागणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विलंबास ठेकेदाराला जबाबदार धरून त्याचेविरुध्द कारवाई देखील करता येणार नाही. तिन महिन्यांनी पावसाळी हंगाम सुरु होत आहे. त्यानुसार रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची आवश्यकता आहे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

वाढीव अंदाजपत्रक
कामाचे आदेश दिल्यानंतर ४७ लाखाचे वाढीव अंदाजपत्रक करण्यात आले. वाढीव काम त्याच ठेकेदाराकडून करून घेण्यात आले. अंदाजपत्रकात झालेले बदल व विहित मुदतीत काम पूर्ण करुन घेण्यास नगर अभियंता व प्रशासनाकडून झालेली दिरंगाईची चौकशी करुन सबंधीतांवर कारवाई करावी, अशी मागणी श्री. मुकादम यांनी केली आहे.